शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने फेटाळला मुख्य आरोपीचा जामीन

By admin | Updated: October 27, 2014 22:30 IST

वाघाच्या कातडी तस्करीत वन विभागाला हवा असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भितीपोटी भुमिगत झाला आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीन

भंडारा : वाघाच्या कातडी तस्करीत वन विभागाला हवा असलेला मुख्य आरोपी अटकेच्या कारवाईच्या भितीपोटी भुमिगत झाला आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीन अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे. दुसरा आरोपी हनुमंतुविरुद्ध वनविभाग आठवडाभरात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणार आहे.मध्य प्रदेश, छत्तीसगढ व ओडिशा येथील काही शिकारी टोळ्यांनी वन्यप्राण्यांना लक्ष्य केले आहे. भंडारा वन विभागाने सप्टेंबर महिन्यात वाघाच्या कातडीसह तस्करांना पकडले होते. त्यांच्या माहितीवरून ओडिशातील नवरंगपूर जिल्ह्यातील हनमंतु साहुच्या अटकेची कारवाई २९ आॅगस्टला करण्यात आली होती. हनमंतू साहूने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी ओडिसा राज्यातील एका राजकीय पक्षाशी संबंधित असून त्याचे नाव शरदकुमार मांझी असे आहे. अन्य एकाचे नाव गणेश मडकाम ऊर्फ गौडा असल्याचे त्याने वनविभागाला दिलेल्या बयानात सांगितले.हनमंतूच्या माहितीवरून वनविभागाने मांझी याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. अटकेच्या भीतीमुळे परिसरात आपली राजकीय प्रतिमा मलिन होईल, असे कारण सांगून त्याने स्वत:हून वनविभागापुढे आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अटकेची कारवाई होणार असल्यामुळे मांझी भुमिगत झाला आहे. मांझी हा ओडीशातील उमरकोट येथील तर गणेश मडकाम हा छत्तीसगढमधील जगदलपूर येथील रहिवाशी आहे. हनुमंतु साहू याच्याकडे सापडलेल्या वाघाचे कातडे तपासणीसाठी हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिना लोटूनही त्याचा अहवाल आलेला नाही. येत्या आठवडाभरात हैद्राबाद येथील अहवाल येताच वनविभाग न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणार आहे. दरम्यान शरदकुमार मांझी याने भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अटकेची कारवाई टाळण्याच्या दृष्टीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर पहिली सुनावनी झाली व वनविभागाला ‘स्टे’ मागितला. वनविभागाच्या युक्तीवादावरून न्यायालयाने मांझीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्याच्या वकीलांनी परत दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर दुसऱ्यांदा सुनावनी व्हायची आहे. सापडलेल्या कातडीची किंमत बाजारभावानुसार २ ते २.५० लाख रूपये इतकी आहे.वनविभागाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्युसीसी) ही प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारित काम करणारी संस्था असून त्यांच्या नेतृत्वात मांझी व मडकामच्या अटकेची कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्र राज्याची डब्ल्युसीसी ओडिशातील बोर्डाशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्यातून मांझी व मडकामविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात येणाार आहे. फरार दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच दोन्ही आरोपी वनविभागाच्या जाळ्यात अडकणार, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. (शहर प्रतिनिधी)