शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्धे करतात धार्मिक रूढीने अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

सालेकसा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणे आज खूपच जिकरीचे काम झाले आहे. भीतीपोटी कोणतेही नातलग, आप्तस्वकीय, मित्रमंडळी ...

सालेकसा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करणे आज खूपच जिकरीचे काम झाले आहे. भीतीपोटी कोणतेही नातलग, आप्तस्वकीय, मित्रमंडळी तर सोडाच; पण स्वत:च्या कुटुंबालाही अंत्यसंस्काराची धार्मिक परंपरा निभावत येत नाही. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे धार्मिक सोपस्कार पार पाडण्यासाठी सालेकसा नगरपंचायतीचे कर्मचारी देवदूत बनून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळताच मनात एक वेगळाच धाक निर्माण होतो. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची हिंमत कोणी करीत नाही. मग ती व्यक्ती आपले खास, जिवलग, नात्यातली असली अगदी तरीही विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट भीती मनात असते. मग अशावेळी धार्मिक रूढीनुसार अंत्यसंस्कार करणे दूरच, अशा कठीणसमयी धाडसाचे काम सध्या नगरपंचायत सालेकसाचे कर्मचारी करताना दिसत आहेत. यासाठी आमगाव खुर्द येथील मोक्षधामाची निवड करण्यात आली आहे.

रात्री-बेरात्री तालुक्यातून कुठूनही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळताच नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या मृतदेहाचे अंत्यविधीचे कार्य केले जात आहे. वनविकास महामंडळाच्या आगारातून लाकडे आणण्यापासून ते सरण रचणे, तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते दहन करणे, असे सर्व सोपस्कार रूढीपरंपरेने केले जात आहेत. यासाठी निर्जंतुकीकरण, पीपीई किट, सामाजिक अंतर, अशा सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक

n अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून, या पथकाचे पर्यवेक्षक म्हणून भीमराव भास्कर यांची निवड करण्यात आली आहे, तर पथकात अनिल नेवारे, कुवर साखरे, रवी मानकर, मनीष शेंद्रे, रवी नेवारे, ओमप्रकाश मानकर आदींचा समावेश आहे. या पथकावर निरीक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय चमूमध्ये अजय वाघमारे, अक्षय पटले, संदीप लहाने, कमलेश टेंभुर्णीकर, संतोष गभणे आदी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.