शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा उद्योग केंद्र्राचा कारभार 'आॅक्सिजन'वर

By admin | Updated: August 15, 2016 00:14 IST

जिल्हा मुख्यालयी उद्योगांसाठी शासनाच्या विविध योजना, बेरोजगार युवकांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, उद्योगांच्या नोंदणीसाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्र स्थापन केले आहे;...

५० टक्के पदे रिक्त : व्यवस्थापकांकडे गोंदिया जिल्ह्याचा प्रभारदेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हा मुख्यालयी उद्योगांसाठी शासनाच्या विविध योजना, बेरोजगार युवकांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, उद्योगांच्या नोंदणीसाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्र स्थापन केले आहे; मात्र सहा वर्षांपासून येथील ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून कारभार सध्या 'आॅक्सिजन'वर सुरू आहे. जिल्ह्याचे हे केंद्र राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या प्रशासकीय इमारतीत आहे. शासनाद्वारे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या योजनांचे संचलनही या केंद्राकडून होते. जिल्हा उद्योग केंद्रात शासनाने मंजूर केलेल्या पदांची संख्या १६ आहे. ज्यात एक महाव्यवस्थापक, दोन व्यवस्थापक, चार उद्योग निरीक्षक, एक शाखा प्रमुख, एक लघु टंकलेखक, एक टिप्पणी सहायक, दोन लिपिक- टंकलेखक, एक वाहनचालक आणि तीन शिपाई नी पहारेकरी, अशी पदे समाविष्ट आहेत. शासनाने प्रत्येक पदासाठी कामाची विभागणी करून दिली आहे. त्यानुसार केवळ विविध योजना जाहीर करून उद्योगांचे काम पूर्ण होणार नाही, तर त्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी असणे गरजेचे आहे. तथापि, मंजूर १६ पैकी ८ पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्ती जिल्हा उद्योग केंद्रात आहेत. म्हणजे ५० टक्के पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या केंद्राचे प्रमुख असलेल्या व्यवस्थापकांकडे गोंदियाचा अतिरिक्त कारभार आहे. जिल्हा उद्योग केंद्रात शासनाने मंजूर केलेल्या पदांची संख्या १६ आहे. यापैकी ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये, व्यवस्थापक, शाखा प्रमुख, एक टिप्पणी सहायक, वाहनचालक यांची प्रत्येकी एक, उद्योग निरीक्षक आणि शिपाई नी पहारेकरी, यांची दोन पदे रिक्त आहेत. कामाचा व्याप, कर्मचारी वर्गाची कमतरता, अशा स्थितीत सध्या कार्यरत अधिकाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमीत कमी अडचणी याव्यात, हा जरी प्रयत्न उपलब्ध अधिकाऱ्यांचा असला तरी प्रत्यक्षात मात्र हे प्रभावीरीत्या पार पाडणे त्रासदायकच ठरत आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे उद्योजक व बेरोजगारांचा रोष मात्र संबंधित अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा या बिकट परिस्थितीत जिल्ह्याचे नुकसान होत आहे. त्यातून औद्योगिक कायापालट कितपत यशस्वी होतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. उद्योजकांच्या कामांना अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही विलंब होत असेल, तर बाहेरून येणाऱ्या उद्योजकाला अडचणींचा सामना करावा लागेल. कामासाठी वाहन नाहीजिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्रात वाहनाची आवश्यकता आहे. शासनाने वाहनचालकाचे पदही मंजूर केले आहे. मात्र येथील कार्यालयासाठी वाहन आणि वाहनचालक नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना उद्योगांच्या विकासासाठी कमालीचा अडथडा निर्माण होत आहे.उद्योगांच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी कार्यालयात मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. गत अनेक वर्षांपासून कार्यालयातील ८ रिक्त पदे आहेत. पदे भरतीसाठी वरिष्ठांकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. पद भरतीचा मुद्दा हा वरिष्ठांचा असल्यामुळे कार्यालयातील पद भरती कधी पुर्ण होईल, हे सांगणे कठिण आहे.मदन खडसे, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा.