शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकाला डावलून सिमेंट रस्त्याचे बांधकाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

तुमसर : नगर परिषद, तुमसर ही कोणत्या न्‌ कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहते, असाच एक प्रकार येथील प्रभाग क्रमांक ...

तुमसर : नगर परिषद, तुमसर ही कोणत्या न्‌ कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहते, असाच एक प्रकार येथील प्रभाग क्रमांक ९ मधील दुर्गा नगर व श्रीरामनगर येथील सिमेंट रोड बांधकामासंदर्भात तेथील नगरसेवकांना कसलीही माहिती न देता अंदाजपत्रकाला डावलून जोमाने रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यासंदर्भात तेथील नागरिकांनी नगरसेवकाकडे तक्रार केली असता सदर प्रकार उघडकीस आला.

तुमसर नगर परिषदेंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ दुर्गा व श्रीरामनगर येथील भोरगडे ते सिंगनजुडे हे सिमेंट रस्त्याचे काम विशेष रस्ता अनुदानांतर्गत स्थानिक नगरसेवकांना माहिती न देता, तसेच अंदाजपत्रकाला डावलून नियमबाह्यरीत्या कंत्राटदारामार्फत सिमेंट रस्त्याचे काम अति जलदगतीने सुरू करण्यात आले. तेथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाकडे बांधकामाबाबतची तक्रार केली असता नगरसेवक बोरकर हे स्वतः बांधकामस्थळी पोहोचले असता सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने बांधकाम बंद करण्यास सांगितले. मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांना भ्रमणध्वनी करून सांगितले असता काही वेळ काम बंद करून परत काम सुरू करण्यात आले. याबाबत गट नेते रगडे यांना माहिती दिली. मात्र, सिमेंट रस्त्याचे बांधकाम जलद गतीने सुरू असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. या भोंगळ कारभाराबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे यांनी दखल घेऊन रस्त्याची वरिष्ठांकडे तक्रार करून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.