शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऐंशीनंतरही ज्येष्ठांचा आत्मविश्वास; २८७ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य २८७  वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही.

ठळक मुद्देजगण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची : इतरांनाही दिली प्रेरणा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील २८७ वृद्धांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. इतरांनाही याबाबत ते प्रेरणा देत आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य २८७  वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही. प्रचंड इच्छाशक्ती व दांडगा आत्मविश्वास जोपासत त्यांनी कोरोनाला हरविले. ६० ते ७० या वयोगटातील ३०६ वयोवृद्ध दुसरा लाटेत मृत्युमुखी पडले तसेच ७१ ते ७९ या वयोगटातील १२२ ज्येष्ठ कोरोनामुळे मृत पावले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाल्यानंतरही वृध्दांनी विशेष काळजी घेतल्याचे पाॅझिटिव्ह हाेण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही

मनुष्याने एकदा मनात आत्मविश्वास निर्माण केला व जिंकण्याची जिद्द सोडली नाही तर तो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. कोरोनाच्या बाबतीतही हेच झाले.  मी हिंमत हारली नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आप्तस्वकीय यांच्याशी बोलत होतो, नातवंडांची हालचाल विचारत होतो. अशात मन गमत गेले.  कोरोनावर  आपण हमखासपणे मात करू शकतो.- नारायण खेडीकर, एकोडी, ता. साकोली

दोन महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला होता. मात्र मी हिंमत सोडली नाही. आरोग्य विभागामार्फत मिळालेली औषधे नियमित वेळेत सेवन केली. कोरोना ब्लॉकमध्ये असतानाही काही अस्वस्थ वाटायचे. मात्र मनाने कधीही खचून गेलो नाही. १४ दिवसांनंतर सुटी झाल्यावर एक वेगळा अनुभव मी प्राप्त केला. माणसाने कधीही जगण्याची उमेद सोडू नये.- बाबुराव वासनिक, ज्येष्ठ नागरिक, भंडारा

४० ते ६० या वयोगटात सर्वाधिक मृत्यू

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली. ४० ते ६० या वयोगटातील नागरिक सर्वाधिक मृत्युमुखी पडले. ४० ते ५०  या वयोगटातील १७५ व्यक्ती दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावले तसेच ५१ ते ६० या वयोगटातील ३०४ व्यक्ती कोरोनाच्या लढाईत हारल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या