शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ४६५ विहिरींचे बांधकाम तातडीने पूर्ण करा

By admin | Updated: February 23, 2015 01:07 IST

रोजगार हमी योजनेतून घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे. धडक मोहीम राबवून जिल्हयातील १,४६५ विहिरी पूर्ण करण्यावर भर द्यावा, ...

दक्षता समितीची बैठक : पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजनाभंडारा : रोजगार हमी योजनेतून घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे. धडक मोहीम राबवून जिल्हयातील १,४६५ विहिरी पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना खासदार नाना पटोले यांनी जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती बैठकीच्या प्रसंगी दिले.यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे भुजल पातळी खाली गेलेली आहे. याचा विचार करुन उन्हाळात पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता त्यासाठी आताच उपाययोजना करा. तातडीने टंचाई जाणवणाऱ्या गांवामध्ये कामे सुरु करा, अशा सूचना जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार नाना पटोले यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता व संनियत्रण समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशिवार, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आढावा घेताना ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत तालुक्यात किती नळ योजना सुस्थितीत चालु आहेत आणि बंद आहेत याची माहिती खंडविकास अधिकाऱ्यांना नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर योजना योग्यपणे सुरु राहण्यासाठी लोकांनी पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करावी, यामध्ये लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आढाव्यात तुमसर तालुक्यातील आलेसूर येथील ३० मजुरांचे वेतन पोस्टाच्या दिंरगाईमुळे ६ महिन्यांपासून झाले नसल्याची माहिती सभापती कलाम शेख यांनी दिली. याबाबत पोस्ट विभाग आणि खंडविकास अधिकारी यांनी लेखी उत्तर दयावे, याबाबत चौकशी करण्यात येईल, असे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. या बैठकीला प्रकल्प अधिकारी जेजूरकर, पंचायत समिती सभापती, निरज मेश्राम, अर्जुन मरसकोल्हे, नलिनी फरकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे, राठोड, महावितरणचे अधिक्षक अभियंता मेश्राम, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे, तहसिलदार, खंडविकास अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)