शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पीक पंचनाम्याचे निर्देश

By admin | Updated: October 14, 2016 00:26 IST

परतीच्या पावसाने धानपिक जमिनदोस्त झाले. यात शेकडो एकरातील धानपिकाला फटका बसला. मराठवाड्यात पंचनामाशिवाय भरघोस मदत देण्यात आली,

शासनस्तरावरून सूचना नाही : प्रकरण धान पिकाच्या नुकसानीचेभंडारा : परतीच्या पावसाने धानपिक जमिनदोस्त झाले. यात शेकडो एकरातील धानपिकाला फटका बसला. मराठवाड्यात पंचनामाशिवाय भरघोस मदत देण्यात आली, मात्र जिल्ह्याचे मुख्य पीक असतानाही व एवढी हानी झाल्यावरही राज्य शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले नाही. परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या हाकेला जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा देत धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्ह्यात या चालू खरीप हंगामात पावणेदोन लक्ष हेक्टरमध्ये धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय ४५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये अन्य पिकांची लागवड केली आहे. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे एकट्या धानपिक क्षेत्रातील २० टक्के क्षेत्र पडीत आहे. परिणामी धानपिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसामुळे हलक्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. तुमसर पासून तर लाखांदूर पर्यंत धानपिक अक्षरश: जमीनदोस्त झाले. नुकसानीची आकडेवारी तालुकानिहाय सर्वेक्षणाअभावी हातात आली नसली तरी राज्य शासनाने पंचनामा करण्याचे कुठलेही निर्देश अजूनपर्यंत दिलेले नाहीत. परंतु या संदर्भात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या संदर्भात गंभीर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी परतीच्या पावसामुळे धानपिकाच्या नुकसानीसंदर्भात पंचनामा करण्याचे तालुका प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या संदर्भात सर्वेक्षण करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला जाणार आहे. आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्याला या पंचनाम्याचा किंबहुना सर्वेक्षणाचा फायदा होणार काय? अर्थात योग्यरित्या सर्वेक्षण होणार काय? असे अनेक सवाल भविष्यात निर्माण होणार आहेत. (प्रतिनिधी)