शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

उमरखेड येथील नायब तहसीलदार हल्ला प्रकरण : ८ मार्चपासून बेमुदत काम बंदचा इशारा भंडारा : उमरखेड येथील नायब तहसीलदार ...

उमरखेड येथील नायब तहसीलदार हल्ला प्रकरण : ८ मार्चपासून बेमुदत काम बंदचा इशारा

भंडारा : उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव परब व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर रेतीमाफियांनी केलेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने तीव्र निषेध केला असून, रेतीमाफिया अविनाश चव्हाणवर तात्काळ कारवाई करावी, असे निवेदन संघटनेच्या भंडारा जिल्हा शाखेने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार साहेबराव राठोड यांनी निवेदन स्वीकारले.

रेती माफियांवर तातडीने कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने २ फेब्रुवारी रोजी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन केले. भंडारा येथे तहसीलदार अक्षय पोयम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आजच्या सामूहिक रजा आंदोलनात सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना २ फेब्रुवारी रोजी राज्यभर सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करून २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतीत निवेदन देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार मंगळवारी भंडारा जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले.

सदर आंदोलनाची व संघटनेच्या मागण्यांची शासन स्तरावर योग्य दखल न घेतल्यास ८ मार्चपासून राज्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत कामबंद आंदोलन करतील व या आंदोलनात सर्व उपजिल्हाधिकारी सहभाग घेतील, असे निवेदनात म्हटले आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात हल्लेखोर कुख्यात गुंड रेती माफिया अविनाश चव्हाण याच्यासह त्याचे सर्व साथीदार, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मालक, चालक या सर्वांवर तातडीने संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. अनधिकृत रेती वाहतूक करणारे रेती माफिया यांच्याकडून महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वारंवार जीवघेणे हल्ले होतात. याला आळा बसावा म्हणून शासनाने तातडीने पावले उचलावीत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.