शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यासह लिपीक निलंबित

By admin | Updated: September 24, 2016 01:43 IST

कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समितीमार्फत सायकल वितरीत करण्यात आले

भंडारा : कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समितीमार्फत सायकल वितरीत करण्यात आले होते. सायकली मंजुरी प्रकरणात नियम व घर ते शाळेचे अंतर या मुद्यांना डावलून ही फाईल जिल्हा समाज कल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. याप्रकरणी झालेल्या चौकशीत मोहाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश खंगार हे दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विस्तार अधिकारी ललीत कुंभरे यांचेकडे समाज कल्याण विभागाचा प्रभार देण्यात आला होता. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामसभेतून निवड झाल्याचे प्रमाणपत्र, शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर दोन किमीपेक्षा अधिक असल्याचे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, खंडविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद समितीकडे सादर करावा लागतो. कांद्री येथील विद्यार्थ्यांचे अर्ज पंचायत समिती येथे दाखल झाले होते. अर्जाची छाणनी व पाहणी करुन सहीनिशी २४ विद्यार्थ्यांचे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे विद्यार्र्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सदर अर्जाची पाहणी मोहाडी पंचायत विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश कुंभरे यांनी केली होती. प्रकरण जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला पाठविले होते. प्रकरण अंगलट येण्याची भीती वाटताच त्यांनी पत्र पाठवून वाटप झालेल्या सायकली परत मागविले होते. कांद्री येथे जावून विद्यार्थ्यांजवळून सायकली परत मागण्याचा प्रयत्न सुध्दा करण्यात आला. त्यामुळे सायकल वाटप प्रकरण वाढले. समाज कल्याण अधिकारी व्ही. के. झिंगरे यांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळून आल्यामुळे ललीत कुंभरे व लिपीक खंगार यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळासाठी त्यांना पंचायत समिती लाखनी येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कांद्री येथील २४ विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रकरणी मोहाडी पंचायत विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश खंगार चौकशीत दोषी आढळून आले. कुंभरे यांचेकडे समाज कल्याण विभागाचा कामकाज सोपविण्यात आला होता. नियमांना डावलून सायकल वाटपाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. - व्ही. के. झिगरे, समाज कल्याण अधिकारी, भंडारा. कांद्री येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकली मंजुरीचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाला ज्यादिवशी पाठविण्यात आले. त्यादिवशी मोहाडीचे खंडविकास अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या जागी प्रभारी सही करून प्रस्ताव पाठविला होता. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. - ललीत कुंभरे, पंचायत विस्तार अधिकारी मोहाडी