शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविले

By admin | Updated: January 12, 2015 22:45 IST

मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील विकास कामाचे देयक देतांना माजी अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणी माजी अध्यक्ष नोकेश्वर

चुल्हाड (सिहोरा) : मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील विकास कामाचे देयक देतांना माजी अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणी माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.तुमसर, बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीच्या मच्छेरा गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या विकास कामावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहे. योजनेला सत्ता हस्तांतरणाचा फटका बसला आहे. वर्षभरात अध्यक्ष व सचिव या पदावर कार्यरत पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात येत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या विकास कामाचे देयक देतांना पारदर्शकता ठेवण्यात येत नाही. यात बनावट स्वाक्षरीचा आधार घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचे २७ आॅक्टोबर २०१४ ला १० हजार रुपयांचे धनादेश क्रमांक ००००१९ चे धनादेश साहित्य पुरवठाधारकाला देण्यात आले आहे. या शिवाय ६ डिसेंबर २०१४ ला पुन्हा ००००२२ क्रमांकाचा १० हजार रुपयाची नोंद असणारा धनादेश देण्यात आलेला आहे. या दोन्ही धनादेशावर अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी स्वाक्षरी केली नाही. परंतु ही दोन्ही धनादेश अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने सिहोरा येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून वटविण्यात आली आहेत. दरम्यान अनुसया ट्रेडर्स च्या नावे दोन्ही धनादेश असून या ट्रेडर्स सोबत कसलाही आर्थिक व्यवहाराचे संबंध नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.याच कालावधीत २४ डिसेंबर २०१४ ला १२ हजार रुपयाचा धनादेश साहित्य पुरवठा धारकाला देण्यात आला आहे. या धनादेशावर अध्यक्षाची बनावट स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास येताच धनादेश वटविण्यात आलेला नाही. परंतु या आधी दोन धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असताना पोलिसांनी साधी चौकशी केली नाही. बनावट स्वाक्षरीचा आधार घेत शासकीय निधीची लुट करण्यात आली आहे. असा आरोप आहे. दरम्यान सरपंच पदावरून उषा पारधी हे पायउतार होताच त्यांचे पती नोकेश्वर पारधी यांची ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपदावर प्रभारी सरपंच योगेश कोकुडे यांची वर्णी लागली आहे. तर प्रभारी सरपंच योगेश कुकडे यांच्या पत्नी आशा कोकुडे या जिल्हा परिषद सदस्या आहेत. यामुळे चौकशी करताना दिरंगाई होत असल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)