शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शासकीय धान्य खरेदी केंद्राची केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 5:00 AM

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. रोजगाराच्या इतर सोई उपलब्ध नसल्याने पारंपरिक शेती व्यवसाय केला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत धान मुख्य पीक असून, लाखो क्विंटल धानाचे उत्पादन होते. धानाला लागणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळणारा दर अल्प आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शासनातर्फे धानाच्या आधारभूत किमती व्यतिरिक्त शासन प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देते. मात्र, धानाची आधारभूत केंद्रावर विक्री केल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नाही.

संजय साठवणेलाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रातील अनियमितता व गैरव्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत भारतीय अन्न महामंडळाचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील धान खरेदीची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. रोजगाराच्या इतर सोई उपलब्ध नसल्याने पारंपरिक शेती व्यवसाय केला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत धान मुख्य पीक असून, लाखो क्विंटल धानाचे उत्पादन होते. धानाला लागणारा खर्च आणि त्या तुलनेत मिळणारा दर अल्प आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी शासनातर्फे धानाच्या आधारभूत किमती व्यतिरिक्त शासन प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देते. मात्र, धानाची आधारभूत केंद्रावर विक्री केल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नाही. पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना धान विकतात. व्यापारी शासकीय दरापेक्षा कमी दारात खरेदी करून तेच धान आधारभूत केंद्रावर विकतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडून सातबारा व  कोऱ्या विड्रॉल फार्मवर स्वाक्षरी घेतात. धानाचे पैसे व्यापारी स्वतः घेतात. या सर्व प्रकारात खरेदी केंद्रांचे सुद्धा हात ओले केले जातात. भंडाराचे खासदार सुनील मेंढे यांनी याबाबत केंद्रीय मंत्रालयात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत भारतीय अन्न महामंडळाचे दाेन सदस्यांचे पथक जिल्ह्यात दाेन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेे. त्या अनुषंगाने सध्या चौकशी सुरू आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

दोन किलो अतिरिक्त धानाचे गौडबंगालशासकीय केंद्रात धान खरेदी करताना चाळीस किलोच्या पोत्यावर दोन किलो अतिरिक्त धान घेतले जातात. नियमाप्रमाणे असे करता येत नाही. मात्र धान खरेदी केंद्रचालकांच्या मनमानी पणामुळे शेतकऱ्यांना दोन किलो धान आधिकचे द्यावे लागताते. प्रति सातबारा विचार केला तर आठ ते दहा हजार रुपयांचे एका शेतकऱ्याचे नुकसान होते. असे बरेच प्रकार दोन्ही जिल्ह्यांत सुरू असून शेतकऱ्यांची लूट केली जाते. या प्रकरणाचीही चौकशी सुरू असून यात किती अतिरिक्त साठा सापडतो याकडे लक्ष आहे. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डGovernmentसरकार