शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार पिढ्यांच्या शिक्षणाची साक्ष देतेय शतकोत्तरी इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे १५ सप्टेंबर १९१३ रोजी शाळेसाठी कौलारू वास्तू साकारण्यात आली. तत्कालीन कोर्ट ऑफ वाॅर्ड सिनियर ...

लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे १५ सप्टेंबर १९१३ रोजी शाळेसाठी कौलारू वास्तू साकारण्यात आली. तत्कालीन कोर्ट ऑफ वाॅर्ड सिनियर भोसला इस्टेट नागपूर मालगुजारी सोनी यांनी शाळेसाठी जागा दान दिली होती. त्यावेळची या जागेची किंमत ५० रुपये होती. दान दिलेल्या जागेवर प्राथमिक शाळा बांधण्यात आली. त्यावेळी लगतच्या जिल्ह्यांसह गावच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येत होते. इमारतीच्या भिंतीवर आजही सुविचार, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, भंडारा जिल्ह्याचा तालुकानिहाय नकाशा, राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत, प्रतिज्ञा, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा कार्यकाल तथा त्यांच्या नावांची यादी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा नकाशा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी यांची फलके रेखाटली आहेत. सध्यातरी या इमारतीच्या भिंती सुस्थितीत असून या भागात वानरांच्या वावराने छतावरील कवेलू दरवर्षी फुटतात. काही प्रमाणात छताचे लाकूड देखील कमकुवत झाले आहे. शाळा प्रशासनातर्फे नियमितपणे शाळेच्या इमारतीची निगा राखली जात आहे. चार पिढ्यांपासून हजारो विद्यार्थी घडल्याने इमारत जमीनदोस्त होऊ नये, यासाठी प्रयत्न होण्याची आज गरज आहे.

बॉक्स

अधिकारी, राजकारणी अन् उत्कृष्ट नागरिक घडले

लाखांदूर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे सोनी. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. चुलबंद व वैनगंगा नदीचा संगम देखील आहे. पूर्वीच्या काळी या लगतच्या तीन जिल्ह्यांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या शाळेतून शेकडो अधिकारी, राजकारणी व उत्कृष्ट नागरिक घडले आहेत. आजही येथील मुख्याध्यापक महारुद्र केंद्रे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.