शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांपासून पाणलोट समितीचा घोळ

By admin | Updated: November 4, 2014 22:35 IST

तालुक्यातील ग्रामपंचायत मोहाडी खापा येथे अवैधरीत्या पाणलोट समिती स्थापन केल्याचा निर्वाळा खुद्द खंडविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. येथील ग्रामसेवकाने कागदावर नियमबाह्यपणे पाणलोट

तुमसर : तालुक्यातील ग्रामपंचायत मोहाडी खापा येथे अवैधरीत्या पाणलोट समिती स्थापन केल्याचा निर्वाळा खुद्द खंडविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. येथील ग्रामसेवकाने कागदावर नियमबाह्यपणे पाणलोट समिती स्थापन केली. अशी तक्रार ११३ ग्रामस्थांनी खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तीन महिन्यांपूर्वी केली होती. येत्या आठ दिवसात समिती स्थापन न केल्यास आंदोलनाचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला आहे.मोहाडी खापा येथे दि. २६ जानेवारी २०१४ ला ग्रामसभेत पाणलोट समितीची स्थापना झाली नाही तरी प्रोसीडींगमध्ये समिती अध्यक्ष, सचिव व इतर सदस्यांची नावे लिहिण्यात आली. या संदर्भात १५ आॅगस्टला ग्रामस्थांनी पाणलोट समिती स्थापन झाली काय? असा प्रश्न ग्रामसेवकाला विचारला, तेव्हा समिती स्थापन झाली असे उत्तर ग्रामसेवकांनी दिले. प्रोसीडिंग बुकमध्ये ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच विमला कानतोडे व सचिव म्हणून मुख्याध्यापक बोपचे यांचे नाव नमूद आहे.११३ ग्रामस्थांनी स्वाक्षरीनिशी खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. चौकशी केल्यावर पाणलोट समिती रद्द ठरविली. यात निवड प्रक्रिया करताना समितीचे सचिव निवडीसाठी गावातील अर्हताप्राप्त उमेदवारांचे अर्ज पाणलोट समितीकडे प्राप्त करून त्यातून सचिवाची निवड ग्रामसभेने करावयास पाहिजे होती. परंतु तशी प्रक्रिया ग्रामसभेत झाली नसल्याने पुन्हा ग्रामसभा घेऊन पाणलोट समितीची रचना करण्याचे आदेश सरपंच व सचिवांना दिले होते. परंतु कारवाई झाली नाही. आठ दिवसात समितीची नवीन रचना न केल्यास दिपक तुरकर, रंजीत बुद्धे, वामन बुद्धे, संतोष शरणागत, दिपक तुरकर, डिलेश शरणागत, विलास पटले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुका कृषी अधिकारी गभणे यांना विचारले असता पाणलोट समितीही ही महत्वपूर्ण समिती असून या संदर्भात संबंधित ग्रामसेवकांशी संपर्क करून तात्काळ पाणलोट समिती स्थापन करण्याचे सांगणार असल्याचे सांगितले. ग्रामसेवक नागदेवे यांना या संदर्भात भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. (तालुका प्रतिनिधी)