शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशी प्लॅटफॉर्मवर मालवाहूंचा थांबा

By admin | Updated: November 29, 2014 23:16 IST

तुमसर रोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वर मालवाहतूक रेल्वेगाड्या तासनतास उभ्या राहतात. याचा हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज फटका बसत आहे.

तुमसर : तुमसर रोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एक वर मालवाहतूक रेल्वेगाड्या तासनतास उभ्या राहतात. याचा हजारो रेल्वे प्रवाशांना दररोज फटका बसत आहे.शुक्रवारी दुपारी १ वाजता शेकडो प्रवाशांची मुंबई हावडा मेल चुकली. रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावरही त्यांना ती दिसली नाही. रेल्वे विभागात नियोजनाचा अभाव दिसून येतो. दुसरीकडे रेल्वे ट्रक प्रवाशांना ओलांडता येत नाही. फूटवे ब्रीज वरून मार्गक्रमण करावा, असा नियम आहे, परंतु येथे फूटवे ब्रीज अर्धवट आहे. दक्षिण पूर्व रेल्वेचे तुमसर रेल्वे जंक्शन मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर आहे. येथे सहा प्लॅटफार्म आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवेश करताच प्लॅटफार्म क्रमांक एकवर सतत मालवाहतूक रेल्वे गाड्या तासनतास उभ्या राहतात. दीड ते दोन दिवस त्यांचा थांबा राहतो. प्लॅटफॉर्म क्रमांक हा जणू मालवाहतूक गाड्यांकरीता आरक्षित ठेवल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)मुंबई हावडा-हावडा मुंबई जलद रेल्वे गाड्यांचा येथे प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वर थांबा रेल्वे विभागाने दिला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर डाऊन प्रवाशी गाड्यांचा थांबा सुरू करण्याची गरज आहे. सध्या अप प्रवाशी गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ तर डाऊन प्रवाशी गाड्या २ वर थांबतात. मालवाहतूक रेल्वे गाड्या येथे सहा क्रमांकावर तासनतास उभ्या करण्याची गरज आहे. नियमावर बोट ठेवणारी रेल्वे यंत्रणा येथे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास मागील अनेक महिन्यापासून देत आहे. यामुळे वृद्ध व लहान मुलांना याचा फटका बसतो. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या मागील भेटीत याची तक्रार केली होती, परंतु अद्याप कारवाई झाली नाही. (तालुका प्रतिनिधी)