शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

चेकपोस्टमध्ये कार शिरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

पोलीस उपनिरीक्षक विवेक निशांत राऊत (३५, जवाहरनगर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई निलेश श्रीकृष्ण नणीर (४०, पोलीस मुख्यालय) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली असून प्रथम भंडारा व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे चेकपोस्ट तयार करण्यात आले.

ठळक मुद्देखरबी नाकाची घटना। पोलीस उपनिरीक्षकांसह दोन जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भरधाव कार अनियंत्रित होऊन चेकपोस्टच्या चौकीत शिरल्याने झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात आरोग्य व पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले.
पोलीस उपनिरीक्षक विवेक निशांत राऊत (३५, जवाहरनगर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई निलेश श्रीकृष्ण नणीर (४०, पोलीस मुख्यालय) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली असून प्रथम भंडारा व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील खरबी नाका येथे चेकपोस्ट तयार करण्यात आले. शनिवारी सकाळी मौदा येथून भरधाव कार (क्रमांक एमएच २७ एसी १२३१) खरबी चेकपोस्टजवळ आली. त्यावेळी पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र अचानक कार अनियंत्रित होऊन तेथे उभारलेल्या पोलीस चौकीला धडक देऊन लगत असलेल्या नालीत जाऊन थांबली. या अपघातात विवेक राऊत आणि निलेश नणीर यांच्या पायावरून कार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. तात्काळ दोघांनाही भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले.

आयुध निर्माणी कर्मचाऱ्याची कार
चेकपोस्टवरील चौकीला धडक देऊन दोन पोलिसांना जखमी करणारी सदर कार जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कर्मचारी संतोष यावलकर यांच्या मालकीची आहे. ते काही कामानिमित्त मौदा येथे गेले होते. शनिवारी सकाळी जवाहरनगरकडे येत होते. सदर कार बाल्या जांभूळकर रा.परसोडी हा चालवित होता. नेमके ते मौदा येथे कशासाठी गेले आणि कार अचानक अनियंत्रित कशी झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जवाहरनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर या चेकपोस्टवरील कामकाज काही काळ खोळंबले होते. या ठिकाणी असलेले वैद्यकीय कर्मचारी आणि इतर पोलीस अपघातातून थोडक्यात बचावले.

टॅग्स :Accidentअपघात