जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

By Admin | Updated: June 27, 2016 00:42 IST2016-06-27T00:42:41+5:302016-06-27T00:42:41+5:30

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण न होता त्यांचे स्थानांतरण करण्यात आले.

Cancel the transfer of district officials | जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

भंडारा : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण न होता त्यांचे स्थानांतरण करण्यात आले. स्थानांतरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सांस्कृतिक संघटना व सुधार समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. धीरजकुमार हे उणे-पुरे एक वर्षापूर्वी भंडारा येथे बदलून आले. यांच्या कालावधीत शासनाच्या विकास कामाच्या योजनांची अत्यंत प्रभाविपणे आणि भ्रष्टाचारमुक्त पूर्तता होत आहे. भंडारा सारख्या मागास जिल्ह्याला एक नवे रुप प्राप्त होत आहे. अशा कर्तव्यकठोर आणि न्याय निष्ठूर, नैतिकताप्रिय अधिकाऱ्याची त्वरीत स्थलांतर झाल्यामुळे येथील जनता आणखी विकासापासून दूर तर जाणार नाही ना? या विचारांनी ग्रासलेली आहे.
प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, कार्य तत्पर अधिकाऱ्याच्या त्वरीत समस्याचे निवारण करणाऱ्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ भंडारा जिल्ह्यात पूर्ण व्हावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात प्रशांत देशभ्रतार, हर्षल मेश्राम, भूपेश शेंडे, प्रफुल देशभ्रतार, अजय तांबे, संदेश नागदेवे, पुष्पा मेश्राम, मनीष नागदेवे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Cancel the transfer of district officials