शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

मातीत राबण्यास बैल झाले सज्ज

By admin | Updated: June 15, 2016 00:45 IST

आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते.

शेतीच्या कामांना वेग : पेरणीच्या कामासाठी बळीराजाची तयारीवरठी : आपल्या कामाचे दिवस आले, उत्सवाचे दिवस आले की सर्वांना आनंद वाटतो. अशीच स्थिती प्रत्येक पशु-पक्ष्यांत आणि जनावरांमध्येसुध्दा पहायला मिळते. पावसाळ्याचा पहिला पाऊस पडताच बैलांनासुध्दा आनंद वाटतो. आपली शिंगे मातीत गाडून चेहरा-मोहरा रंगवून बैल या नवीन हंगामाचा आनंद व्यक्त करताना दिसतात.पावसाळ्याचे दिवस येताच बळीराजा सावधान होतो आणि आपल्या शेतीच्या कामाला लागून राहतो. शेतीचे कामे नसल्याने फेब्रुवारीपासून बैलांनासुध्दा आराम करायला मिळतो. उन्हाळा माणसालाच नाही तर जनावरांनासुध्दा कष्टदायी असतो. या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण, चाऱ्यांची समस्या, उष्णतेचा उकाडा आदी समस्या निर्माण होत असल्याने उन्हाळ्याचे दिवस सर्वांनाच न आवडणारे असतात. भारतीय संस्कृतीत शेती कामाला, सण उत्सवाला अशा अनेक कार्यात नक्षत्राला खूप महत्व दिले आहे. मृग नक्षत्र ७ जूनला लागल्यानंतर शेतीच्या कामाला वेग येतो. याच नक्षत्रात पेरण्याचे काम जोमात सुरू केले जातात. रोहणी नक्षत्र आणि मृृग नक्षत्र आले की शेतीच्या कामाचे दिवस आल्याची भावना सर्वसामान्यात दृढ झाल्याचे दिसून येते. या नक्षत्रात भरपूर पाऊस आला तर बळीराजा सुखावला व आनंदीत झाला, अशी सर्वांची समजूत असते. यावर्षीसुध्दा रोहणी आणि मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसहीत जनावरातसुध्दा आनंद निर्माण झालेला आहे. रोहिणीचे पाणी पडले तेव्हा बैलांनासुध्दा आनंद झालेला आहे. बैलांना असा आभास झाला असावा की, आता आपल्या कामाचे दिवस आलेत. म्हणजेच बैलांच्या श्रमाचे दिवस जवळ आलेले आहेत. (वार्ताहर)