शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली.

ठळक मुद्देप्रशासनाकडून दुर्लक्ष :शेतकरी, व्यापारी, ग्राहकही संकटात, नुकसानीची पाहणी करण्यास कुणाला सवड नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना समृध्द करणारी येथील बीटीबी सब्जीमंडी वैनगंगेच्या महापुराने गाळात रुतली. एका रात्री होत्याचे नव्हते झाले. बीटीबीला बेटाचे रुप आले होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकही संकटात आले. मात्र पुर ओसरुन आता पंधरा दिवस झाले तरी शासन आणि प्रशासनाच्यावतीने साधी विचारपूसही करण्यात आली नाही.येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली. तेथील भाजीपाला, कॅरेटस् पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर तेथे असलेले वाहनही तीन दिवस ३० फुट पाण्यात होती. बीटीबी सब्जीमंडीच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करीत होते. आता पूर ओसरल्यानंतर बीटीबी सब्जीमंडी ओस पडल्याचे दृष्य आहे. शासनाकडून मदत मिळण्याची आशा आहे. परंतु ना अधिकाऱ्यांनी ना लोकप्रतिनिधींनी सब्जीमंडीला भेट दिली. साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.प्रशासनाने महापुराची वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान बीटीबीचे झाले नसते, एवढे बोलले जात आहे. बीटीबीने विविध सामाजिक उपक्रमात शासन आणि प्रशासनाला मदत केली. परंतु बीटीबी संकटात असताना कुणीही अद्यापपर्यंत मदतीला धावून आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने तीन दिवसाचा जनता कफर्यू लागू केला. यात जीवनावश्यक वस्तूंना सुट देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांचा विचार करण्यात आला नाही. बीटीबी थेट तीन दिवस बंद करण्याचा आदेश मिळाला त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आधीच महापुराने उद्ध्वस्त झालेली बीटीबी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासन मात्र कोणतीही सहकार्य करतांना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यातून समृध्दीची वाट दाखविणाºया बीटीबीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करीत आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान निश्चितच टाळता आले असते. पंरतु कोणतीच पूर्वसूचना मिळाली नाही. त्यामुळे बेसावध क्षणी बीटीबी सब्जीमंडी उद्ध्वस्त झाली. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत करावी.- बंडू बारापात्रे,अध्यक्ष बीटीबी

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार