कोरोना प्रतिबंधासाठी गावसीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:26+5:30

भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतु सर्वच गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळून व्यवहार करताना गावात दिसत आहे. परंतु बाहेरगावावरून येणाऱ्यांमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच इंदोरा येथील नागरिकांनी गावाच्या सर्व बाजुंनी काटेरी कुंपण लावले आहे.

Border of village closed for Corona restriction | कोरोना प्रतिबंधासाठी गावसीमा बंद

कोरोना प्रतिबंधासाठी गावसीमा बंद

Next
ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील प्रकार : शहरातून गावात आणि गावातून बाहेर जाण्यास बंदी

दयाल भोवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना शासकीय पातळीवर केल्या जात असताना आता गावकरीही पुढे सरसावले आहेत. लाखांदूर तालुक्यातील इंदोरा गावाला चारही बाजुंनी काटेरी कुंपण टाकून गावबंदी करण्यात आली आहे. बाहेगावावरून आलेल्या कुणाला गावात प्रवेश दिला जात नाही तर गावातून कुणाला बाहेरही जावू देत नाही. गावातील विविध ठिकाणी विशिष्ट अंतर राखून तरूण निगरानी करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. परंतु सर्वच गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येकजण सामाजिक अंतर पाळून व्यवहार करताना गावात दिसत आहे. परंतु बाहेरगावावरून येणाऱ्यांमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच इंदोरा येथील नागरिकांनी गावाच्या सर्व बाजुंनी काटेरी कुंपण लावले आहे.
येथे येणाºया जाणाऱ्यांवर करडी नजर असते. गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून जीवनावश्यक वस्तूंची तेवढी दुकाने शासकीय नियमानुसार सुरू असतात. कुणीही जमाव न करता तेथे वस्तुंची खरेदी करीत आहे.
दुकानांमध्ये एका किंवा दोन व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो. गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात असून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

Web Title: Border of village closed for Corona restriction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.