शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून नाकाबंदी, जनतेचा स्वयंस्फूर्तीने लाॅकडाऊनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

सर्वसामान्य माणसांना घरीच राहून कोरोना संसर्ग टाळण्याकरिता प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे. कोरोनाची  वाढती संख्या सगळ्यांना चिंतेत टाकणारी आहे. रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्ण भरती झाल्यावर  औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा भयानक तुटवडा जिल्ह्यात आहे. केमिस्टकडून विक्री बंद आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग टाळण्याकरिता प्रशासनाच्या वतीने आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कपालांदूर :  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले गेले असून त्या अंतर्गत पालांदूर येथेसुद्धा शनिवारी व रविवारी कडकडीत बंद पाडण्यात आला. याकरिता जनतेने स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले हे विशेष! कोरोनाचे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य माणसांना घरीच राहून कोरोना संसर्ग टाळण्याकरिता प्रशासनाच्या वतीने आवाहन केले जात आहे. कोरोनाची  वाढती संख्या सगळ्यांना चिंतेत टाकणारी आहे. रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्ण भरती झाल्यावर  औषधांचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा भयानक तुटवडा जिल्ह्यात आहे. केमिस्टकडून विक्री बंद आहे. उपचाराकरिता डॉक्टरकडून  रेमडेसिविर  इंजेक्शनची मागणी होत आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची केविलवाणी धडपड नजरेत भरणारी आहे. अख्खे प्रशासन औषधाचा तुटवडा अनुभवत आहे. परंतु अपेक्षित सेवा अजून तरी सुरळीत झालेली नाही. अशा कठीणप्रसंगी प्रत्येकाने स्वतःला सावरत शासनाने पुरविलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने नियमितपणे सुरू आहे. पालांदूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व बीट अंतर्गत नाकाबंदी करण्यात आलेली आहे. चौका-चौकात पोलिसांची देखरेख असून नाहक फिरणाऱ्याला तंबी देण्यात येत आहे. केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरू असून बाकी सर्व बाजारपेठही बंद ठेवण्यात आलेली आहे. सोमवारपासून शासन नव्याने पुरविणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार बाजारपेठेबाबत चालू-बंदचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी सांगितले.

तरुणाई रस्त्यावरतरुणाई मात्र रस्त्यावर फिरताना दिसते. नाहक कोणतेही काम नसताना चौकात किंवा आडोशाला उभी राहून गर्दी वाढवण्याचा प्रयत्न तरुणाई करीत आहे. 

दररोज रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक गत हप्तभरापासून ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढत आहेत. हेच रुग्ण कोरोनाचे संख्याबळ वाढवीत आहेत. साधा ताप जरी कुटुंबात आला तरी संपूर्ण परिवारात दहशत निर्माण होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस