शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा निवडणूक निकाल; भाजपचे झाले पानिपत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 20:48 IST

Maharashtra vidhan sabha election Results 2019 ; Bhandara Election Results 2019; साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले या महाआघाडीच्या उमेदवारांसोबत भंडारा अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी विजयाचा झेंडा रोवला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली मतदारसंघात भाजपचे पानिपत झाले. बंडखोरांनी भाजपचा घात केला. साकोली मतदारसंघात भाजपचे परिणय फुके यांनी सुरूवातील आघाडी घेतली. मात्र, नंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर मात करीत विजय मिळविला. भंडारा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने तिनही आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र जनतेने त्यांना कौल नाकारला.विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील तीनही जागांवर ताबा मिळविण्यात महाआघाडी आणि अपक्षाला यश आले आहे. तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे, साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले या महाआघाडीच्या उमेदवारांसोबत भंडारा अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी विजयाचा झेंडा रोवला.साकोली मतदारसंघाकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले होते. कोण विजयी होणार याची सर्वांना उत्सुकता होती. सुरूवातीच्या फेºयात भाजपचे डॉ. परिणय फुके आघाडीवर होते. मात्र नंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत. हेवीवेट लढतीत येथे काँग्रेसने विजय संपादित केला. तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आणि भाजप बंडखोर अपक्ष चरण वाघमारे यांच्यातच खरी लढत झाली. भाजपचे प्रदीप पडोळे तिसºया क्रमांकावर गेले. विशेष म्हणजे चरण वाघमारे यांची तिकीट नाकारून भाजपने नगराध्यक्ष पडोळे यांना रिंगणात उतरविले होते. येथे राष्ट्रवादीचे कारेमोरे यांनी विजयी मिळविला. भंडारा मतदारसंघात अपक्ष नरेंद्र भोंंडेकर यांनी विजयी संपादित करून इतिहास रचला. आजपर्यंत या मतदारसंघात कोणताही अपक्ष उमेदवार विजयी झाला नव्हता. भोंडेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून त्यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र महायुती आणि महाआघाडीने आपल्या घटक पक्षाला ही जागा सोडल्याने भोंडेकरांनी बंडखोरी केली. त्यांना मतदारांनी पसंती देत अपक्ष आमदार विधानसभेत पाठविले. जिल्ह्यात उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

टॅग्स :bhandara-acभंडाराNana Patoleनाना पटोले