शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर

By admin | Updated: November 26, 2015 00:39 IST

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने ग्रामवासीयांसाठी एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली.

देव्हाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रमहजारोंचे बक्षीस : ग्रामसभेतून निरीक्षण समितीची निवडकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीने ग्रामवासीयांसाठी एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली. सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर असे त्या उपक्रमाचे नाव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून या अभिनव उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत स्पर्धेत सहभागी ग्रामस्थांच्या वर्षभरातील कामकाजांचे परिक्षण ग्रामसभेतून निवड झालेल्या समितीकडून होणार आहे. यशस्वी ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी बक्षीसांचे वितरण केले जाणार आहे.वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या तीन हजार लोकसंख्येच्या गावात जून २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. गावकऱ्यांनी सत्ता परिवर्तन करीत विद्यमान उपसरपंच महादेव फुसे, दिनदयाल बोंदरे यांच्या पॅनलला सत्तारूढ केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी गावात आरोग्य व शांतता नांदावी, या हेतूने एका अभिनव उपक्रमाची योजना आखली. या उपक्रमाला नाव दिले. सुंदर माझं घर, स्वच्छ परिसर या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून उदंड प्रतिसाद लाभत आहे. कुटूंबांना हजारो रूपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे. २ आॅक्टोंबरपासून सुरू झालेल्या उपक्रमांचे बक्षीस १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांना दिले जाणार आहेत. सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, ग्रामसेवक तभाणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभत आहे. अनेक ग्रामपंचायतीची या उपक्रमाविषयी विचारणा होत असून अशाच प्रकारचा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा मानस व्यक्त करीत आहेत. देव्हाडा ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून ग्रामपंचायतीच्या हद्दीत वैनगंगेच्या पवित्र पावन पात्रात नरसिंह भगवानाचे प्रसिद्ध मंदिर आहे. वैनगंगा साखर कारखाना व गुरांचा प्रसिद्ध बाजार याच गावात भरत असून तुमसर ते गोंदिया, तुमसर-देव्हाडा-साकोली मार्गावर गाव वसलेले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरीक पाहणीसाठी येत आहेत. (वार्ताहर)