शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या त्रासाने शेकडो वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

मोहाडी : पूर्वी चारही बाजूला शेतशिवारात उंच उंच दिसणारे डौलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. याचे ...

मोहाडी : पूर्वी चारही बाजूला शेतशिवारात उंच उंच दिसणारे डौलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, शेतकऱ्यांना होणारा माकडांचा त्रास होय. माकडांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी शेतकरी थेट डेरेदार वृक्षांवरच कुऱ्हाड चालवत आहेत. तालुक्यात यापद्धतीने शेकडो वृक्षांची कत्तल दिवसाढवळ्या होत आहे. वृक्ष जगवायचे असेल या माकडांचा बंदोबस्त होणे आवश्यक झाले आहे. मात्र सध्यातरी या मर्कटलीलांकडे कुणाचेच लक्ष नाही.

मोहाडी तालुक्यातील शेतशिवारात गत काही दिवसांपासून माकडांचा प्रचंड त्रास आहे. माकडांचे मोठमोठे अनेक कळप तयार झाले आहेत. त्यांच्यापासून शेतमालाची नासाडी होत आहे. माकड व रानडुकरांनी शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. या माकडांच्या त्रासामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी लाखोरी, तूर, हरभरा, वाटाणा, मोहरी आदी पिके घेणेच बंद केले आहे. माकडे या पिकांची इतकी नासाडी करतात की शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

आता माकडांच्या त्रासाला कंटाळून अनेक शेतकरी शेतशिवारातील बाभूळ, आंबा, चिंच, हिरडा, बेहडा, बोर, कडुनिंब, मोहफूल, खैर आदी वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालणे सुरू केले आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर सावलीसाठी मोठे झाड दिसले की माकडे आपले बस्तान मांडतात. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी त्या शेतकऱ्यावर दबाव आणून झाड तोडण्यास बाध्य करतात. काही बांधावर आंबा, चिक्कू, बोर अशी झाडे लावली, परंतु माकडांनी त्या झाडांची नासाडी केल्याची अनेकांची तक्रार आहे. काही शेतकऱ्यांनी कान्द्री वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन माकडांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. मात्र त्यांची विनंती धुडकावून लावण्यात आली व स्वतः बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.

बॉक्स

शहरातही माकडांचा उच्छाद

माकडांनी आता आपला मोर्चा जंगलातून शेतशिवारात आणि तेथून शहराकडे वळविला आहे. गावात व शहरातील फळझाडांची नासधूस करीत आहेत. गृहिणींनी उन्हाळ्यात तयार केलेले खाद्यपदार्थ छतावर किंवा अंगणात वाळायला टाकतात माकड त्यावर यथेच्छ ताव मारतात, त्यामुळे गृहिणींची सर्व मेहनत तर व्यर्थ जाते. आर्थिक भुर्दंड सुध्दा सोसावा लागतो. तसेच पूर्वी माकडे धाक दाखविल्यावर, फटाके फोडल्यावर पळून जायचे. परंतु आता ते एवढे धीट झाले आहेत की उलट अंगावरच धावून येतात.

कोट

संपूर्ण माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या आमच्याकडे कोणतीही योजना नाही, परंतु एखाद्या माकडाने माणसावर हल्ला केला तर आम्ही त्याला पकडून जंगलात सोडून देतो.

केशव राठोड

वनपरिक्षेत्र अधिकारी, कान्द्री ता. मोहाडी