पथनाट्यातून काेविडविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:49+5:302021-02-05T08:40:49+5:30

एकोडी : राम सागर ग्रामीण विकास बहू. संस्था सोनेगाव जयहिंद कलापथक संच यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ कोरोनाविषयी जाणीव ...

Awareness about Kavid through street plays | पथनाट्यातून काेविडविषयी जनजागृती

पथनाट्यातून काेविडविषयी जनजागृती

एकोडी : राम सागर ग्रामीण विकास बहू. संस्था सोनेगाव जयहिंद कलापथक संच यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ कोरोनाविषयी जाणीव जागृती कार्यक्रम कलापथकाच्या माध्यमातून एकोडी, सोनेगाव, धर्मापुरी, सुकळी, उमरी, परसोडी, विरसी, सातलवाडा येथे सादर करण्यात आले.

कलापथकाच्या माध्यमातून तोंडाला मास्क बांधा, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझरने किंवा साबणाने हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा असे संगीतमय वातावरणात गीताच्या माध्यमातून व अभियानाच्या माध्यमातून दहा कलावंतांनी सादर केली. गायक भावेश कोटांगले, गायक मनोज कोटांगले, संस्था सचिव दिलीप बिसेन, सोनू मेश्राम, संदीप कोटांगले, बालू भुजाडे, यशवंत बागडे, अरविंद शिवणकर, तेजस कोटांगले,ममता कुरंजेकर, अर्चना कानेकर या कलावंतांनी सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

Web Title: Awareness about Kavid through street plays