शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईसाठी पीक विमा कंपनीची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ ...

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीक विमा कंपनीने हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीक कर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपनीकडून मदत मिळाली नसल्याने पीककर्ज अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.

बॉक्स

तीन एकरातील धान पीक उद्‌ध्वस्त होऊनही विमा कंपनीने हात वर केले

भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथील सुरेश गिरीपुंजे यांच्या शेतातील चार एकर धान पीक तुडतुडा पिकाने उद्‌ध्वस्त केले होते. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, सोसायटीचे प्रतिनिधी, पीक विमा प्रतिनिधी, गावचे उपसरपंच यांनी पाहणी केली होती. त्यानंतर विमा कंपनीकडून मदत मिळेल अशी आशा होती. मात्र, वारंवार फोन करूनही विमा प्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक शेतकरी विमा कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. फक्त भंडारा तालुक्यातच नव्हे तर पवनी, लाखांदूर, तुमसर तालुक्यातही हजारो शेतकरी आजही पीक विमा मदतीपासून वंचित आहेत. शेतकरी अनेकदा विमा कंपनीच्या प्रतिनिधींना फोन करतात. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

बॉक्स

पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपनीच्या फायद्यासाठी

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र शासनाने खरीप आणि रबी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबविली. जिल्ह्यात १ लाख ८३ हजार ४०१ शेतकरी खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मात्र, त्या तुलनेत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे की पीक विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणीही होत आहे. याशिवाय जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विमा प्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज आहे.

कोट

धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी सहायक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.

सुरेश गिरीपुंजे,

शेतकरी, खरबी नाका.