शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रामाणिकता

By admin | Updated: May 3, 2017 00:37 IST

प्रामाणिकता शब्दात विश्वासहार्यता दिसून येते. अशी माणसे दुर्मिळ झाली. दुमिळामुळे प्रामाणिकतेचे महत्व वाढते.

तुमसर रोड स्थानकावरील घटना : रोख, सोन्यांच्या दागिन्याची बॅग परत केली

तुमसर : प्रामाणिकता शब्दात विश्वासहार्यता दिसून येते. अशी माणसे दुर्मिळ झाली. दुमिळामुळे प्रामाणिकतेचे महत्व वाढते. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर एका महिलेची बॅग विसली. ती पुढच्या प्रवासाकरिता रवाना झाली. गाडी सुटल्यावर तिच्या लक्षात आले. दरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवानांनी ती बॅग स्वत:कडे सुरक्षित ठेवली. दुसऱ्या गाडीने ती महिला परत आल्यावर ती बॅग तिच्या स्वाधीन करण्यात आले. प्रामाणिकता आजही जिवंत असल्याचे या घटनेवरुन दिसून येते.सविता संतोष पडोळे ही महिला तुमसर रोड रेल्वेस्थानकावरुन अमरावती ला जाण्याकरिता प्लॅटफार्मवर आल्या. शालीमार एक्सप्रेसने त्या प्रवास करणार होत्या. प्लॅटफार्मवर गाडी येताच त्या प्रवाशी डब्यात बसल्या, पंरतु प्लॅटफार्मवर त्या एक बॅग विसल्या. त्या बॅगमध्ये सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची नथ, नगदी तथा मोबाईल होता. धावत्या गाडीत पडोळे यांनी लक्षात आले. पंरतु काय करावे हे त्यांना कळेनासे झाले.दरम्यान रेल्वेस्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे सुरक्षा जवान ईशांत दिक्षीत, श्यामकुंवर याना ती बॅग दिसली. त्यांनी बॅगची तपासणी केल्यावर त्यांना सोन्याचे दागीने, रोख रक्कम दिसली. सदर बॅग रेल्वे सुरक्षा कार्यालयात जमा करण्यात आली. महिलेच्या बॅगमधील मोबाईलने इतर नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर पडोळे यांना माहिती मिळाली. सविता पडोळे ह्या मुंबई -हावडा मेलने पुन्हा तुमसर रोड स्थानकावर परत आल्या. त्यानंतर रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पडोळे यांनी ती बॅग परत दिली. यामुळे पडोळे अत्यंत भारावून गेल्या. प्रामाणिकता आजही जिवंत आहे असे उद्गार त्यांनी सुरक्षा बलाच्या जवानाबाबतीत काढले. प्रवाशी गाडी आल्याने घाईत बॅग रेल्वे स्थानकावर विसरल्याचे सविता पडोळे यांनी यावेळी सांगितले.तुमसर रोड येथील रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविता पडोळे यांना ती बॅग परत करण्यात आली. यावेळी इशांत दिक्षीत, संदीप, जितेद्र वाघमारे, श्याम बिहारी, रेल्वे समिती सदस्य एम. डी. आलावान सह कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)