शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानांतरणावरून वातावरण तापले

By admin | Updated: February 11, 2016 00:55 IST

जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव येथील एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीच्या पालकाबाबत अभद्र भाषेचा वापर केला.

डोंगरगाव येथील प्रकार : शिक्षकावर अर्वाच्च शब्दाचा वापर केल्याचा आरोप मोहाडी : जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरगाव येथील एका शिक्षकाने एका विद्यार्थीनीच्या पालकाबाबत अभद्र भाषेचा वापर केला. याप्रकरणी त्या शिक्षकाचे स्थानांतरण करून कारवाई करण्यात आली. मात्र गावातीलच काही व्यक्तींनी त्या शिक्षकाची बाजू घेवून स्थानांतरण रद्द करण्याची मागणीसाठी पंचायत समिती मोहाडी येथे राडा केला. या प्रकरणामुळे डोंगरगाव येथे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. सध्या वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.डोंगरगाव येथील इयत्ता १० वी इंग्रजी विषयाचे शिक्षक एम.व्ही. बालपांडे यांच्यावर अभद्र भाषेचा वापर केल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने लावला होता. त्यामुळे त्यांची या शाळेतून बदली करण्यात आली. मात्र ऐन परिक्षेच्या तोंडावर शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांच्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे काही पालकांनी त्याच शिक्षकाची मागणी रेटून धरली आहे. काही पालकांच्या मते बालपांडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. राजकीय द्वेषातून त्यांच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. यासाठी पंचायत समिती मोहाडी येथे निवेदन देण्यात आले. बालपांडे यांनाच पुन्हा डोंगरगाव शाळेत पाठविण्यात यावे, अशी मागणी सरपंच शकुंतला सेलोकर, उपसरपंच जगदीश पंचभाई, सदस्य दिनेश सेलोकर, देवानंद साऊसाखरे, माधुरी समरीत, विजय बारई, शामकला सेलोकर, रंजना मांढरे आदी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता कोणते पाऊल उचलते, याकडे डोंगरगाववासीयांचे लक्ष लागलेले आहे. (शहर प्रतिनिधी)संबंधित प्रकरणाची शिक्षण विभाग पं.स. मोहाडीद्वारे चौकशी केली असता शिक्षक एम.व्ही. बालपांडे हे प्रथमदर्शनी दोषी आढळले तसा अहवाल मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांना पाठविण्यात आला. त्यांच्या आदेशान्वयेच सदर शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.-रमेश गाढवे, गटशिक्षणाधिकारी पं.स. मोहाडी.