शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याही अहवालात रोजगारसेवक दोषी

By admin | Updated: October 5, 2015 01:02 IST

कान्हळगाव येथे पांदन रस्ता व नाला सरळीकरणाचे काम कागदोपत्री पूर्ण केल्याची तक्रार करण्यात आली.

रक्कम वसुलीचे निर्देश : पदावरुन कमी करण्याची शिफारसमोहाडी : कान्हळगाव येथे पांदन रस्ता व नाला सरळीकरणाचे काम कागदोपत्री पूर्ण केल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणाची दोनदा चौकशी करण्यात आली. यात ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचे स्पष्ट झाले. रोजगार सेवकाला कामावरुन कमी करून रक्कम वसूल करण्याचे निर्देश चौकशी अधिकऱ्यांनी दिले आहे. कान्हळगाव सिरसोली येथील पांदन रस्ता व नाला सरळीकरणाच्या कामाचे बनावट मजुरीपत्रक, मोजमाप पुस्तीका तयार करण्यात आली. त्या आधारे विशिष्ट मजुरांच्या नावावर रक्कम जमा झाली. ती रक्कम ग्राम रोजगार सेवकाने परस्पर उचलली. ही बाब उघडकीस आली. आॅनलाईन प्रणालीमुळे बनावट कामाचे बिंग फुटले. या बनावट कामाचे सर्व पुरावे तक्रारकर्ता राजेंद्र मसर्के यांनी जमा केले. यामुळे मोहाडी पंचायत समितीत खळबळ उडाली. एवढे होवूनही पंचायत विस्तार अधिकारी यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. पण तक्रारकर्त्याने मंत्रालयात तक्रार केली. वरिष्ठांचे निर्देश मिळताच विस्तार अधिकारी (पंचायत) कुंभरे यांनी चौकशी केली. मात्र, त्याचा अहवालाला विलंब लावला. याबाबत 'लोकमत'ने हे प्रकरण लावून धरले. यामुळे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी अहवाल तयार केला. यात ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला.कान्हळगाव (सिरसोली) येथील रोजगार हमी योजनेच्या बनावट कामाची तक्रार मंत्रालयापर्यंत गेल्यामुळे तक्रार निवारण प्राधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी दुसऱ्यांदा संबंधिताला नोटीस बजावून भंडारा येथे प्रत्यक्ष बोलावले. माजी सरपंच अनूप उटाणे, तांत्रिक पॅनल अधिकारी गिरीश झंझाड, सुरेशकुमार भैरम, ग्रामसेवक सुनिल ब्राम्हणकर, ग्रामरोजगारसेवक मुलेश्वर कुथे, जीवन झंझाड, नरेश चवळे, तक्रारकर्ता राजेंद्र मसर्के, मजूर निलकंठ चवळे यांचे बयान घेण्यात आले. तक्रार निवारण प्राधिकारी अधिकाऱ्याने चौकशी अहवाल पारीत केला. तसेच आदेश तयार केला. या प्रकरणात ग्रामरोजगार सेवक मुलेश्वर कुथे याला दोषी ठरविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)