अन् परप्रांतीय विक्रेते, मजुरांना अश्रू झाले अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:33+5:30

संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय करण्यात आल्याने या मजूरांनी सुटकेचा श्वास सोडला. दररोज दोन वेळचे पोटभर जेवण आणि कुटुंबासह स्वत:ची निवासाची व्यवस्था झाल्याने हे मजूर निश्चिंत झाले आहेत.

And the traditional vendors, the laborers, were in tears | अन् परप्रांतीय विक्रेते, मजुरांना अश्रू झाले अनावर

अन् परप्रांतीय विक्रेते, मजुरांना अश्रू झाले अनावर

Next
ठळक मुद्देसंकटातील मदत विसरणार नाही : वर्ध्याहून छिंदवाडाकडे निघालेल्या मजूरांची व्यथा

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरुन झाडू विकणाऱ्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील मजुरांना संचारबंदीच्या काळात प्रशासनाने मदतीचा हात दिला. त्यांची येथील शासकीय वसतीगृहात भोजनासह निवासाची व्यवस्था केली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते.
संचारबंदीमुळे कुठे फिरता येईना, परिणामी झाडू विक्री बंद झाली. आपल्या मूळ गावी जायचे तर हातात पैसे नाहीत आणि आता तर सीमाबंदीच्या कठोर आदेशाने मध्यप्रदेशातील झाडूची विक्री करून पोट भरणारे ५७ जण चिंतीत होते. अशा विक्रेत्यांची शासकीय वसतीगृहात उत्तम सोय करण्यात आल्याने या मजूरांनी सुटकेचा श्वास सोडला. दररोज दोन वेळचे पोटभर जेवण आणि कुटुंबासह स्वत:ची निवासाची व्यवस्था झाल्याने हे मजूर निश्चिंत झाले आहेत.
संचारबंदीच्या कालखंडात आलेल्या कटु अनुभवांचा काही जणांनी वसतीगृहाच्या अधीक्षक रजनी वैद्य यांच्यासमोर पाढाच वाचला. त्यामुळे गत दोन दिवसापासून तुम्ही आमची काळजी घेतलीत, इतकी तर आमच्या घरीपण व्यवस्था नाय असे सांगितले. पण जाता जाता आमच्याकडे देण्यासारखं काही नाय पण आमची काहीतरी आठवण ठेवून घ्या म्हणत काही महिलांनी मॅडम आमच्या जवळील झाडू तरी किमान वसतीगृहासाठी भेट म्हणून ठेवून घ्या असे म्हणत वसतीगृहासाठी झाडू भेट दिले.
वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूंबाबत मार्गदर्शन करुन आम्हाला खरोखरच मानसिक धीर दिला. यावेळी अनेकांना बोलताना अश्रू अनावर झाले. वर्धा, नागपूरवरुन पायी चालत येताना काही खायला तर मिळतच नव्हते. पण इथे आल्यावर घरच्यापेक्षाही चांगली व्यवस्था केल्याने आम्ही खरच शासनाचे लई आभारी आहोत असे कुटुंब प्रमुखांनी सांगितले. धास्तावलेल्या निराधार मजूरांची जिल्हाधिकारी व शहरातील नागरिकांनी मदत केल्याचे अधीक्षक वैद्य यांनी सांगितले. निराधारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी तसेच मुलींच्या वसतीगृहातील कर्मचारी वैशाली गजभिये, अश्विनी नागदेवे, अनिता बुजडे, राधेश्याम बुजदे, सीमा सुखदेव, त्रिशीला बागडे, गीता बागडे, विनोद गोंनादे, स्वयंपाकी कारेमोरे, मोहन धारगावे दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात आमच्याकडून निराधार कुटुंबाची सोय होत असल्याने अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या आदेशाचे पालन करुन घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.
-रजनी वैद्य, अधीक्षक, शासकीय वसतीगृह, भंडारा.

Web Title: And the traditional vendors, the laborers, were in tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.