शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीनही आमदार कसतात शेती; सेंद्रीय शेतीकडे ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी गावात आले की, एक चक्कर शेतावर मारतातच. सेंद्रिय भाजीपाला घेण्याकडे त्यांचा कल असून घरी गायीसुद्धा आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राजकारण आणि समाजकारण करताना कितीही व्यस्त असले, तरी मुळात शेतकरी असलेले जिल्ह्यातील तीनही आमदार वेळात वेळ काढून शेतीकडे लक्ष देतात. आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड देत सेंद्रिय शेतीही करीत आहे. भंडाराचे आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी आपल्या शेतात सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड सुरू केली, तर तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे आपल्या भावाच्या मदतीने शेतीचे याेग्य नियाेजन करतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले आपल्या व्यस्त वेळापत्रकातही सुकळी या आपल्या गावी आले की, शेतात गेल्याशिवाय राहत नाही. 

व्यस्ततेतही सुकळीच्या शेतात पटाेलेंचा फेरफटकाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी गावात आले की, एक चक्कर शेतावर मारतातच. सेंद्रिय भाजीपाला घेण्याकडे त्यांचा कल असून घरी गायीसुद्धा आहेत. 

उत्पादनवाढीकडे राजू कारेमाेरेंचे लक्षराइस मिल असाेसिएशनचे अध्यक्ष असलेले आमदार राजू कारेमाेरे मुळात शेतकरी. त्यांच्याकडे ५० एकर शेती असून आपल्या लहान भावाच्या मदतीने ते शेतीचे नियाेजन करतात. धान, तूर, लाखाेरी, गहू, पाेपट, चणा, हरभरा आदी पिकांचे नियाेजन केले जाते. शेती हा २४ तासांचा आणि जाेखमीचा व्यवसाय आहे, असे सांगतच त्यांनी कृषी विभाग शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करत नसल्याची खंत व्यक्त केली.

नरेंद्र भाेंडेकर अल्पभूधारक शेतकरीभंडाराचे आमदार नरेंद्र भाेंडेकर अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीत नवनवीन प्रयाेग करून शेती कसतात. यावर्षी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लावला आहे. घरी खाण्यासाेबतच सेंद्रिय भाजीपाल्याची ते विक्रीही करतात. शेतात साेलरपंप लावणार असल्याचे सांगत शेतीसाठी मनुष्यबळ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :MLAआमदारagricultureशेती