शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेचे सर्व विभागांनी योग्य नियोजन करावे

By admin | Updated: June 27, 2016 00:33 IST

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्य उपयोग करावा.

नाना पटोले : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक भंडारा : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्य उपयोग करावा. यासोबतच कुठल्याही विभागाचा निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना खासदार नानाभाऊ पटोले यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सवर्साधारण योजनेकरीता १०१ कोटी ६६ लाख २१ हजार तरतूद अर्थकल्पित करण्यात आली होती. यंत्रणेकडून मार्च २०१६ अखेर १०१ कोटी २९ लाख ५७ हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी ९९.६४ टक्के आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ३९ कोटी ४७ लाख एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून शासनाकडून ३७ कोटी ६३ लाख ५ हजार रुपये प्राप्त झाले. संपूर्ण निधी कार्यवाही यंत्रणेस वितरित करण्यात आलेला असून यंत्रणेकडून मार्च २०१६ अखेर ३६ कोटी ६६ लाख ५१ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला. खर्चाची टक्केवारी ९७.४३ टक्के आहे. आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र योजना अंतर्गत १२ कोटी ८४ लाख ४० हजार एवढा निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी शासनाकडून १२ कोटी २५ लाख ९१ हजार निधी प्राप्त झाला. मार्च 2016 अखेर ११ कोटी ८६ लाख ९७ हजार एवढा निधी खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ९६.८२ टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी सवर्साधारण योजना ९९ कोटी ६८ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ४३ कोटी ७१ लाख व आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र योजना १३ कोटी ६३ लाख ४३ हजार एवढा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या नियतव्ययाचे नियोजन आजच्या बैठकीत ठेवण्यात आले. या बैठकीत वन विभागाचे पट्टे वाटप, जिल्हा परिषदचे ग्रामीण रस्ते, पथदिवे, व्यायामशाळांचा विकास, शाळांच्या वर्ग खोल्या, सामूहिक विवाह योजना, नावीन्यपूर्ण योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, कर्ज पुर्नगठन, यात्रास्थळ विकास, पिक विमा योजना, पशुसंवर्धन व जलयुक्त शिवार यासह विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार व अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी विविध प्रश्न व समस्या या बैठकीत मांडल्या. जिल्हा नियोजन मधून विकास कामे करतांना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार कामे करावी, असे आमदारानी सूचविले. या बैठकीस सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)