जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:01+5:30

भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे येथे मद्य विक्रीला परवानगी मिळेल, असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहरातील इतर दुकाने सुरू झाली. त्यामुळे मद्य शौकीनांचा आशा पल्लवीत झाल्या होत्या. काहींनी तर दारू दुकानापुढे ठिय्याही दिला होता. मात्र दुपारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंदन यांनी आदेश काढून जिल्ह्यातून मद्यविक्रीची सर्वच दुकाने पुर्वीप्रमाणे बंद राहतील असे म्हटले आहे.

Alcohol is not allowed in the district | जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाहीच

जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाहीच

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मद्य शौकिनांची निराशा, दुकानासमोर सकाळी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाने दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला. यामुळे गत ४० दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ असलेल्या मद्य शौकीनांची निराशा झाली.
भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे येथे मद्य विक्रीला परवानगी मिळेल, असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहरातील इतर दुकाने सुरू झाली. त्यामुळे मद्य शौकीनांचा आशा पल्लवीत झाल्या होत्या. काहींनी तर दारू दुकानापुढे ठिय्याही दिला होता. मात्र दुपारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंदन यांनी आदेश काढून जिल्ह्यातून मद्यविक्रीची सर्वच दुकाने पुर्वीप्रमाणे बंद राहतील असे म्हटले आहे.
या आदेशाने मद्य शौकीनांची निराशा झाली असली तरी अनेकांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून दारूबंदी आवश्यकच असल्याचे अनेक जण सांगत होते. मात्र मद्यपींची आणखी प्रतीक्षा सुरू झाली.

Web Title: Alcohol is not allowed in the district