शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रोखला रस्ता

By admin | Updated: November 11, 2014 22:33 IST

जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

पवनी : जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाची स्थिती होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.अनिल मारोती सानगडीकर (३२) रा.रामपूरी वॉर्ड पवनी असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. ही घटना मंगळवारला सकाळी ८.३० च्या सुमारास जवाहर गेटसमोर घडली. जनावरे भरुन नेणाऱ्या ट्रक क्रमांक सी.जी. ०४ एन ३७८७ने अनिलचा बळी घेतला. त्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त करीत जोपर्यंत ट्रक मालकास बोलावून मृतकाच्या कुटुंबियाला आर्थिक मदत दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती होती. मृतकास पाच वर्षाचा व पावणेतीन महिन्याची एक मुलगी असून पत्नी, आई, वडील असा आप्त परिवार आहे.अनिल हा सकाळी जवाहर गेटमधून सायकलने रस्ता ओलांडून रामपूरी वॉर्डातील घराकडे जाणारा रस्ता ओलांडत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याघटनेनंतर नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलीस विभागाविरुद्ध असंतोष व्यक्त करीत हल्लाबोल केला. जवाहर गेटच्या दोन्ही बाजुने २०० मीटर अंतरापर्यंत कोणतेही वाहन थांबून राहू नये, मृताच्या कुटुंबियाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, जवाहर गेट चौकात नियमित वाहतूक पोलीस असावा, जवाहरगेट परिसरात उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई करण्यात यावी तसेच रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टरवर आळा घालण्यात यावा. जवाहर गेट चौक परिसर हा वर्दळीचा व शाळकरी मुले, मुली याच रस्त्याने ये जा करीत असल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरिता त्यांचेवर अंकुश लावण्यात यावा, अशा मागण्या करुन मृतदेह न उचलण्याची भूमिका नागरिकांनी घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांच्या मध्यस्थीमुळे नागरिकांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतदेह उचलण्यासाठी संमती दिल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आला. घटनास्थळावर परिस्थिती चिघळू नये, यासाठी पवनीचे ठाणेदार नगरे तसेच अड्याळचे पोलीस कर्मचारी नजर ठेवून होते. (शहर/ तालुका प्रतिनिधी)