शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा येथे सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारत निवडणूक आयोगातर्फे विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा करण्यात आली असून आदर्श आचार संहिता शनिवारपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आदर्श आचार संहितेसंदर्भात सर्व नोडल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय योजनांचे तसेच राजकीय व्यक्तींचे फोटो असलेले पोस्टर, बॅनर फ्लेक्स, कटआऊट्स २४ तासाच्या आत काढून टाकावेत. सार्वजनिक इमारतीवरील जसे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, शासकीय बसेस, टेलिफोन खांब, विद्युत खांब, नगरपालिका, स्थानिक स्वराजय संस्थेच्या इमारतीवरील राजकीय जाहिराती ४८ तासाच्या आत काढण्याची कार्यवाही करावी. लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगर परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इत्यादी लोकप्रतिनिधींना दिलेली शासकीय वाहने तात्काळ जमा करावी. आचारसंहितेच्या कालावधीत कोणतीही निविदा प्रक्रिया, निविदा उघडणे, कार्यरंभ आदेश, नवीन काम सुरु करता येणार नाही.
विद्युत बिल, टेलिफोन बिलावर राजकीय नेत्यांचे फोटो छापू नये. तसेच शासकीय कार्यालयाच्या संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांचे फोटो काढून टाकावेत. भूमिपूजन, उद्घाटनाच्या जागेवरील मजकूर झाकून ठेवावा. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय कर्मचाºयांनी त्यांच्या मोबाईलवरुन किंवा सोशल मिडियावरुन कोणत्याही पक्षाचा उमेदवाराच्या प्रचाराच्या पोस्ट शेअर करु नये, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आचार संहितेच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचे काम करता येईल. पूर, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित असलेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदत व पुनर्वसन कार्य सुरु करता व ठेवता येईल. आपत्तीमधील कोणतेही काम करता येईल. तसेच गंभीर आजारी असलेल्या व्यक्तीला उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सेवा देणे सुरु ठेवता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, डॉ. सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपवन संरक्षक विवेक होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019