भंडारा तालुक्यात दोन कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:01:00+5:30

तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व्हावे, शेतकऱ्याची कुठेही फवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.

Action on two agricultural centers in Bhandara taluka | भंडारा तालुक्यात दोन कृषी केंद्रांवर कारवाई

भंडारा तालुक्यात दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Next
ठळक मुद्देविक्रीबंदचे आदेश : बांधावर खते, बियाणे पोहचविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविण्यात येत आहे. मात्र शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणाºया तसेच बिल बुक, वजनकाटा, पॉस मशीनवरील व स्टॉकबुकवरील रासायनिक खतांचा हिशोब न जोडणे या कारणावरून भंडारा तालुक्यातील दोन कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व्हावे, शेतकऱ्याची कुठेही फवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात खते, बियाण्यांचा साठा करून ठेवणारा तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे बांधावर पोहचविण्यात टाळाटाळ करणाऱ्या कृषी केंद्रांना अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. कोरोना पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होणार नाही यासाठी कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाच्या समन्वयातून योग्य ते नियोजन करावे याबाबतच्या सूचना पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी दिल्या. तालुक्यातील विविध गावातील कृषी केंद्रांना भेटी देत शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या कृषी निविष्ठांचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचवेळी शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही अथवा तक्रार येणार नाही यासाठी कृषी केंद्र चालकांनी सकारात्मक भूमिका निभावण्याचे आवाहन करण्यात आले.

शासनाच्या निर्देशानुसार सर्व कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना बांधावर खते पोहचविणे आवश्यक आहे. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या.
-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी भंडारा.

Web Title: Action on two agricultural centers in Bhandara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.