शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

अबब... भटईची एक रुपये किलो दराने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : कवडीमोल दराने होतेय भाजीपाला विक्री, उत्पादन खर्चही निघेना

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत चालल्याने राज्यात चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्याने शेतकऱ्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्याबाहेर होेणारी मालवाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला बाहेर निर्यात होणे बंद झाले आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना बसत आहे.लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समारंभ, धार्मीक कार्यक्रम बंद झाल्याने वांग्याची मागणी घटली आहे. अतिशय चविष्ट व काळसर जांभळ्या रंगाच्या या वांग्याला मोठी मागणी असते. या भटई वांग्याचे एक वैशिष्ट म्हणजे अतिशय आकर्षक असल्याने ग्राहकांची मागणी असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भटई वांग्याची लागवड तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातील अनेक शेतकरी करतात. लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादकांमध्ये मोठे संकट उभे राहिले आहे.मागणीअभावी शेतकऱ्यांना भाव मिळेनासा झाला. ठोक व्यापारी शेतकऱ्यांकडून एक ते चार रुपये इतक्या अल्पदराने वांग्याची मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दराने भाजीपाला विकावा लागत आहे.भटई वांगे तोडणीसाठी १२० रुपये मजुरांना मजुरी द्यावी लागते.शेतकऱ्याला तोडणी करणे, औषध फवारणी, निंदणी, लागवड खर्च, मशागतीचा खर्च, बिजायतीचा खर्च पकडला असता लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.तालुक्यातील लाखनी, लाखोरी, सावरी, सोमलवाडा अशा अनेक गावांमध्ये भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भेंडी, चवळी, शेंगा, पालक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकरी कवडीमोल दराने भाजीपाला विक्री करीत असल्याने चिंतेत आहे.दर नसल्याने शेतकऱ्याला नैराश्य येत असून शेतकरी आपल्या गुरांना भाजीपाला टाकत असल्याचे चित्र तालुक्यातील अनेक शेतशिवारात दिसून येत आहे.शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी. कोरोना संकटामुळे शेतकºयांना मोठे संकट कोसळले असून शासनाच्या मदतीशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही.-पुनेश्वर सिंगनजुडे,उपसरपंच लाखोरी.

टॅग्स :vegetableभाज्या