शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

९४० किलो मोहफुलाचा सडवा पकडला

By admin | Updated: October 19, 2016 00:51 IST

तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बपेरा, देवसर्रा, सोंड्या, दावेझरी परिसरात अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टी दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर...

पोलिसांची कारवाई : सिहोरा परिसरात अवैध दारु अड्ड्यावर धाडीतुमसर : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बपेरा, देवसर्रा, सोंड्या, दावेझरी परिसरात अवैधरित्या मोहफुलांची हातभट्टी दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडसत्र राबवून मोहफुलासह दारू जप्त केली. यात आरोपींच्या ताब्यातून ९४० किलो मोहफुलाचा सडवा, ६७ लिटर हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा ५,४२० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील विजय डोंगरे, जयसिंग लिल्हारे, भूषण मेश्राम, प्रदीप बागडे, नामदेव बळदे, ईश्वर चौधरी, सुधीर धमगाये, विनोद आरीकर, विनोद उपरकर यांनी केली. यावेळी बपेरा, देवसरा, सोंड्या याठिकाणी धाड घालून दारू गाळणाऱ्या चार लोकांविरूद्ध व विक्री करणाऱ्या चार जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ९४० किलो मोहफुलाचा सडवा, ६७ लिटर हातभट्टी दारू गाळण्याचे साहित्य असा ५,४२० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक घूसर हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)सिहोरा परिसरात कोंबडा बाजारावर धाडतुमसर : तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोहाडी, खापा, थेरकरटोली येथे बाजुचे जंगलात काही ईसम हे कोंबड्याची झुंज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी धाड घालून जैराम थेरकर, भूषण थेरकर, जितेंद्र थेरकर, प्रभाकर सोरते, देवानंद पाटील, अर्जुन भलावे, सुखचंद कटरे या सात आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून आरोपीकडून काती लावून असलेले तीन जखमी कोंबडे जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक जायले हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)