शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

८९ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची 'कुऱ्हाड'

By admin | Updated: March 29, 2015 00:53 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांमध्ये जिल्ह्यात ८९ कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत.

भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांमध्ये जिल्ह्यात ८९ कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, शासनाने कंत्राटी पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.राज्य शासनाने आरोग्य विभागाच्यावतीने २०१०-११ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची सुरूवात केली. राज्यातील १६ जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात समन्वयक, डेटा एंट्री आॅपरेटर, आरबीएसके फार्मसिस्ट, लेखापाल, एनपीसीबी, एनसीडी (संपूर्ण कार्यक्रम), सिकलसेल तालुका सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील लॅब टेक्निशियन, सांख्यिकी अन्वेषक आदी पदांवर जिल्ह्यात ८९ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, शासनाने या कार्यक्रमांतर्गत कार्यरत ७५ टक्के कंत्राटी पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागातील निम्याहून जास्त पदे रिक्त आहे. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेत कार्य करताना उच्चरक्तदाब, मधुमेह, लखवा, हृदयरोग, कर्करोग याबाबत जनजागृती व उपचार करून नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य शासनाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्याने या कर्मचाऱ्यांवर भविष्यात उपासमारीचे संकट ओढवणार आहे. (शहर प्रतिनिधी)