शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

७० जोडपे अनुदानापासून वंचित

By admin | Updated: April 21, 2015 00:31 IST

पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.

शुभमंगल योजना अपयशी : अनेकांचे विवाह लग्न सोहळ्यातगोंदिया : पैशांचा अपव्यय व वेळेची बचत करण्यासाठी शासनाने सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले. या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना १० हजार तर विवाह घडवून आणणाऱ्या संस्थांना प्रत्येक जोडप्यावर दोन हजार रूपये दिले जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ७० जोडप्यांना अजूनपर्यंत अनुदान देण्यात आले नाही. परिणामी शुभमंगल योजना अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वर्षात शुभमंगल योजनेंतर्गत जिल्हयातील सहा संस्थांकडून करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यातील ८६ जोडप्यांना १० लाख ३२ हजार रूपये अनुदान देण्यात आले. परंतु ७० जोडप्यांना अजूनही कवडीची मदत देण्यात आली नाही. त्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेली जोडपी या अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. लग्न लावून देणाऱ्या संस्था फक्त आपले अनुदान वाढविण्यासाठी वर-वधूंची संख्या वाढवितात. परंतु ते जोडपे निकष पुर्ण करीत नसल्याने अनुदानापासून वंचित राहतात. एकाच वर्षातील एवढे जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. मागील तीन वर्षाची संख्या पाहता शेकडोंच्या संख्येत जोडपे अनुदानापासून वंचित आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांंना अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात केले जात आहे. मागील तीन ते चार वर्षाच्या तुलनेत हा प्रकार गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेले जोडपे कागदपत्रांचीपुर्तता योग्यरित्या करीत नसल्यामुळे त्यांना अनुदान देण्यात आले नाही. सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झालेल्या जोडप्यांना शुभमंगल कन्यादान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवीत आहेत. लोकांनी सामूहिक विवाह सोहळ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. (तालुका प्रतिनिधी)संघटनांमध्ये स्पर्धाआयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांची संख्या अधिक असावी यासाठी सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणाऱ्या संस्था प्रयत्न करतात. अनेक संस्था लोकप्रतिनिधींच्या हाताशी काम करणाऱ्या लोकांच्या असल्यामुळे किंवा नेत्यांच्याच असल्यामुळे आपल्या संस्थेकडून अधिक जोडप्यांचा विवाह करण्यासाठी चढाओढ लागली आहे. सर्वाधिक जोडप्यांचे लग्न आपण घडवून आणले असा वेगळा बाणा दाखविण्याचा शौक काही संघटनांना आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह सोहळ््यात लग्न करण्यास आलेल्या जोडप्यांची शहानिशा न करता त्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात उरकून टाकतात.