शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

६९ शाळांचे भवितव्य ‘अधांतरी’

By admin | Updated: March 4, 2016 00:25 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. याची प्रचिती आता भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आली आहे.

कमी पटसंख्येचा बसणार फटका : शिक्षण विभागाचा शासनाकडे अहवाल सादर, शिक्षक-विद्यार्थ्यांचे होणार समायोजनप्रशांत देसाई  भंडाराइंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. याची प्रचिती आता भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आली आहे. याबाबत शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे तसा अहवाल सादर केला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात जिल्ह्यातील ६९ शाळांमधील पटसंख्या २० पेक्षा कमी राहिल्यास त्या बंद होण्याची स्थिती उद्भवू शकते. विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. यानुसार, राज्यातील शाळांची अद्यावत माहिती शिक्षण विभागाने मागितली. पुढील वर्षीच्या नविन शैक्षणिक सत्रात शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येची माहिती घेण्यात आली. यात भंडारा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेला अहवालातून धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेला इयत्ता पाचवीचा वर्ग जोडणे व सातवीपर्यंतच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमाच्या शाळा त्यात विशेषत: जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता कमी असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. इयत्ता पहिली ते चवथीपर्यंच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडल्यानंतरही जर पटसंख्या २० पेक्षा कमी राहिल्यास अशा शाळांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे पटसंख्या कमी असल्याने शिक्षकांना महिन्याचा पगार देणे शिक्षण विभागाला परवडण्याजोगा नाही. त्यामुळे अशा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना जवळच्या दुसऱ्या शाळेत समायोजित करण्यात येणार आहे.त्यादृष्टिने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आताच तशी पाऊले उचलली आहे. नुकतीच राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून त्यांच्या जिल्ह्यातील माहिती मागविली. यात जर अशी परिस्थिती उद्भवल्यास अनूदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगर पालिका, खासगी, मदरसा अशा ६९ शाळांमध्ये यावर्षी २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या आहेत. त्यातुळे पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या शाळांवर कदाचित गडांतर येवू शकते. या शाळेत शिकणाऱ्या ८७६ विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्यात येणार आहे.