शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

५७०२ होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स २४, ४८ व ७२ तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतीनही मतदारसंघाचा समावेश : आदर्श आचारसंहिता सुरु होताच जिल्हा प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तीनही क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी ठिकाणावर लावण्यात आलेली ५ हजार ७०२ होर्डिंग, बॅनर, पाम्लेट, पोस्टर्स हटविली आहेत. तर ३ लाख ६० हजार ९९० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आली आहे. १६४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून १८२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये याकरीता तीनही मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर खबरदारी घेतल्या जात आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स २४, ४८ व ७२ तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तुमसर क्षेत्रातील सर्वाधिक २८११, साकोली १०५४ तर भंडारा १८३७ असे ५७०२ होर्डिग, बॅनर व पोस्टर्स हटविण्यात आले. तर ६ लाख ६० हजार ९९० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. १७४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून १८२ जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता तीनही क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे.आचार संहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे शासकीय सार्वजनिक, खाजगी ठिकाणी होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.फलक दिसणार नाहीत याची खबरदारी घ्याशासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास, तर खाजगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स ७२ तासात हटविण्यात यावे, असे सख्त निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या निर्देशान्वये जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदेर्शानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. हटविण्यात आलेले जागेवरील फलक पुर्ववत लावण्यात येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019