४.७० लाखांची दारू जप्त

By Admin | Updated: May 4, 2017 00:21 IST2017-05-04T00:21:41+5:302017-05-04T00:21:41+5:30

अवैध वाहतुकीदरम्यान केलेल्या कारवाईत दोन इसमांच्या ताब्यातून वाहनासह चार लक्ष ६९ हजार ९३६ रूपयांची दारू जप्त करण्यात आली.

4.70 lakh liquor seized | ४.७० लाखांची दारू जप्त

४.७० लाखांची दारू जप्त

दोघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
भंडारा : अवैध वाहतुकीदरम्यान केलेल्या कारवाईत दोन इसमांच्या ताब्यातून वाहनासह चार लक्ष ६९ हजार ९३६ रूपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
प्रफुल्ल विनायक शेंडे (६२) रा. ईमामवाडा नागपूर व गिरीश रामरतन राजाभोज (४१) रा. भगतसिंग वॉर्ड भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी राजेदहेगाव परिसरात मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी अवैध वाहतुकीवर पाळत ठेवून होते. यादरम्यान एका चारचाकी गाडीतून दारूची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने तसेच संबंधित वाहनाची तपासणी केल्यावर चारचाकी व दुचाकी वाहनातून ५१ पेट्यांमध्ये २,४४८ दारूचे पव्वे आढळून आले. या सर्व साहित्यांची किंमत चार लक्ष ६९ हजार ९३६ रूपये सांगतण्यात येते. दोन्ही आरोपींविरूद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली. ही कारवाई विभागाच्या उपआयुक्त उषा वर्षा यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक सुरेंद्र मनपिया, निरीक्षक एस.एच. मेहकरकर, अरविंद कोटांगले, जे.ए. अंबुले, जयघोष जनबंधू, मंगेश ढेंगे, सविता गिरीपुंजे यांनी केली. तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 4.70 lakh liquor seized