शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

३० कि.मी. अंतरावर १६ थांबे

By admin | Updated: March 6, 2015 00:59 IST

जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे.

तुमसर : जलद व सुखकारक प्रवासाचा दावा करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या तुमसर ते भंडारा ३० कि.मी. दरम्यान धावणाऱ्या जलद बसला १६ थांबे दिले आहे. याकरिता एक तासाचा प्रवास करावा लागतो. तुमसर ते भंडारा व नागपूर करिता जलद व सामान्य (लोकल) बसचे भाडे सारखेच आहे. जलद बसचा पहिला थांबा किमान ६० कि.मी. वर असावा असा नियम आहे. येथील जलद बसची गती केवळ ४० कि.मी. प्रती तास आहे.तुमसर ते भंडारा पर्यंत जलद बसचे १६ थांबे असल्याने गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यास किमान एक तासाचा अवधी लागतो. जलद बस तुमसरवरून सुटल्यावर खापा, मोहाडी येथील न्यायालयाजवळ, बसस्थानक, मोहाडी चौकात, कुशारी फाटा, चौंडेश्वरी माता फाटा, पोलीस ठाणे, मोहगाव देवी, पाचगाव फाटा, सनफ्लॅग फाटक, वरठी टी पॉइंट, भंडारा आयटीआय, लालबहादूर शास्त्री चौक, खामतलाव, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक व शेवटी भंडारा बसस्थानक असे थांबे आहेत. तुमसर ते भंडारा सामान्य (लोकल) बसचे २२ ते २५ थांबे आहेत.जलद बसची गती महामंडळाने ५५ ते ६० इतकी निश्चित केली आहे. येथे ४० च्या वेगाने बस धावत आहे. नियमानुसार जलद बसगाड्यांचा थांबा ६० कि.मी. वर असतो. परंतु मोहाडी तालुक्याचे स्थळ व भंडारा जिल्ह्याचे स्थळ असल्याने दोन थांबेच पाहिजे. परंतु येथे नियमाला बगल दिली आहे. मोहगाव देवी येथे जलद बसचा थांबा विनंतीवरून दिला आहे. विभागीय कार्यालय भंडारा यांनी तसा आदेश दिला आहे.तुमसर नागपूर जलद बसचे भाडे १०७ रुपये व सामान्य (लोकल) चे बसभाडे १०७ रुपयेच आहे. तिकीट दर निश्चित करण्याचा अधिकार नागपूर विभागीय कार्यालयाला असल्याची माहिती आहे. एका वर्षाआधी तुमसर आगाराला वार्षिक साडे पाच लाखाचा नफा झाला होता. सध्या तो नफा साडेचार लाखावर आला आहे. तुमसर आगारात एकूण ७० बसगाड्या आहेत. या गाड्यांचा मेंटेनन्स बरोबर होत नाही. बसगाड्यात स्वच्छता नाही. बसण्याची व्यवस्था बिकट आहे. बॉडी अँगल शेवटचा श्वास घेत आहेत. येथे जुन्या बसगाड्या अति जलद व जलद गाड्या म्हणून धावत आहेत.केवळ लांब पल्ल्याच्या नवीन बस धावतात. तुमसर - परतवाडा, अकोला, माहूर, राजूरा या लांब पल्ल्याच्या बस आहेत. वाहकांची संख्या १२३, चालक १६७, वाहकांच्या रिक्त जागा १३ आहेत. वेळ जास्त लागणे व बसगाडे जास्त द्यावे लागत असल्याने येथील जलद गाड्यांना प्रवाशी भेटत नाही. येथे प्रवाशी खासगी गाड्यांचीच जाण्याला प्रथम प्राधान्य देतात. नियम सांगणारे महामंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)