शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता अपघातात दोन महिन्यात २९ जण मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे६१ अपघात : ७२ जखमी, मृतांमध्ये दुचाकी चालकांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत दोन महिन्यात झालेल्या ६१ रस्ता अपघातात २९ जण मृत्युमुखी पडले असून ७२ जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये सर्वांधिक संख्या दुचाकी चालकांची आहे.
भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्गावर कुठे ना कुठे अपघात होत आहे. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ६१ अपघाताची नोंद करण्यात आली आहे. त्यात जानेवारी महिन्यात १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर फेब्रुवारी महिन्यात १६ जणांना मृत्यू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यात अपघाताची संख्या वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १७ पोलीस ठाणे असून सर्वाधिक दुर्घटना कारधा आणि लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपघातात १६ जण मृत्युमुखी पडले असून त्यात भंडारा ठाण्यांतर्गत चार, जवाहरनगर एक, वरठी दोन, करडी एक, तुमसर चार, साकोली तीन, अड्याळ दोन, दिघोरी दोन आणि आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, पालांदूर, पवनी लाखांदूर ठाण्यांतर्गत प्रत्येक एक अपघात झाला. यापैकी १४ जणांचा मृत्यू जाग्यावरच झाला.
भंडारा शहरातील शितला माता मंदिराजवळ असलेल्या खड्डयाने एका तरूणाचा बळी घेतला. गत सहा महिन्यांपासून या परिसरात निर्माणाधीन रस्त्यावर खड्डे पडले होते. परंतु त्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघाताची नोंद होत आहे. मुजबी ते शिंगोरीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग दुहेरी असून रस्त्याच्या मधात दुभाजकही नाही.

वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. जिल्ह्यात झालेल्या अपघातात सर्वाधिक मृतांची संख्या दुचाकी चालकांची आहे. त्यापैकी कुणीही हेल्मेट घातले नव्हते.
-चंद्रशेखर चकाटे, वाहतूक शाखा प्रमुख

टॅग्स :Accidentअपघात