शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

२,८०८ सर्पदंश, ६,१५० जणांना कुत्र्याचा चावा

By admin | Updated: July 26, 2014 23:56 IST

जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून यात १५ जणांचा मृत्यू झाला.

तीन वर्षात १५ जणांचा मृत्यू : ग्रामीण भागात श्वानदंशांचे प्रमाण अधिकभंडारा : जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून यात १५ जणांचा मृत्यू झाला. यापेक्षा भयावह आकडेवारी श्वानदंशांची असून मागील तीन वर्षात ६,१५० जणांना कुत्र्यांनी चावा घेतला असून सुदैवाने मृत्यूच्या घटना घडलेल्या नाहीत. श्वानदंशांच्या घटनाग्रामिण रुग्णालय स्तरावर २०१२-१३ या वर्षात २,९८८ जणांना कुत्र्याने चावा घेतला. २०१३-१४ मध्ये २,३५५ जणांना, २०१४-१५ मध्ये ७७० जणांना कुत्र्याने चावा घेतला असून मृत्यूची घटना नाही.प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र स्तरावर २०१०-११ या वर्षात ७६८ जणांना कुत्र्याने चावा घेतला. २०११-१२ या वर्षात ९७८ जणांना, २०१२-१३ मध्ये १,०२८ जणांना, २०१३-१४ मध्ये ७७७ जणांना तर २०१४-१५ मध्ये २३७ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्पदंशांच्या घटनाग्रामिण रुग्णालय स्तरावर २०१२-१३ या वर्षात ३४५ जणांना सापाने दंश केला असून ८ जणांचा मृत्यू झाला. २०१३-१४ मध्ये ३६८ जणांना चावा घेतला असून ७ जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. २०१४-१५ मध्ये ५३ जणांना सर्पदंश झाला असून मृत्यूच्या घटना नाहीत. प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र स्तरावर २०१०-११ या वर्षात २५ जणांना सापाने दंश केला. २०११-१२ या वर्षात ३६ जणांना, २०१२-१३ मध्ये २१ जणांना, २०१३-१४ मध्ये १३ जणांना तर २०१४-१५ मध्ये ३ जणांना सर्पदंश झाला असून कुणाचाही मृत्यू नाही. असे एकूण मागील तीन वर्षांत २,८०८ जणांना सापाने चावा घेतला असून त्यांना सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात १५ जणांना जीव गमवावा लागला. एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत सामान्य रूग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या १० रुग्णालयामध्ये सर्पदंशाचे ५३ रूग्ण दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाल्याने सर्पदंश झालेल्या नागरिकांचे प्राण वाचविण्यात आरोग्य विभागाला यश आले. (प्रतिनिधी)अशी घ्या काळजी़़़ज्या परिसरात साप अधिक आहेत असे वाटते़, त्या ठिकाणी शक्यतोवर खाटेवरच झोपावे़ सोबत टॉर्च ठेवावी़ रात्री घराबाहेर जाताना बुट घालून निघावे़ याशिवाय हातात काठी ठेवावी़ परंतु, या काठीचा उपयोग साप मारायला करायचा नाही़ काठीने जमीनीवर ठकठक करीत चालायचे़ जमिनीचे कंपनं सापाला कळतात़ त्यामुळे तोच वाटेतून दूर होतो़ आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घडतात. आश्रमशाळा व वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अशीच काळजी घ्यायला हवी. गावात रात्रीच्या वेळी पथदिवे सुरू राहिल, अशी व्यवस्था करायला हवी. गावठी उपचार न करता सर्पदंश झाल्यानंतर थेट रूग्णालयात दाखल होण्याची गरज आहे.