शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

भाेजापूर येथील महात्मा फुले काॅलनी मधील रहिवासी चंदनलाल घरडे यांनी वसंत हुमणे यांना खासगी कामासाठी मार्च २०१५ मध्ये हातउसणे १२ लाख ५० हजार रुपये दिले हाेते. त्याबाबत करारनामाही करवून घेतला हाेता. करारनाम्यानुसार २९ जून २०१५ नंतर वेळाेवेळी रक्कम परत देण्याची विनंती केली. परंतु वसंत हुमणे ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत हाेते. शेवटी ३० जानेवारी २०१६ राेजी त्यांनी कॅनेरा बॅंकेच्या वरठी शाखेचा धनादेश फिर्यादीला दिला. परंतु सदर धनादेश बॅंक खात्यात वटविला असता ताे बाउंस झाला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माेहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी तसेच भंडारा येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वसंत हुमणे यांना एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकारात न्यायालयाने फिर्यादीला २० लाख रुपये दंडाची रक्कम चार महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले आहे. तसेच आराेपीने दंडाची रक्कम देण्यास कसूर केल्यास त्यांना चार महिन्यांची शिक्षेचेही प्रावधान करण्यात आले आहे. भाेजापूर येथील महात्मा फुले काॅलनी मधील रहिवासी चंदनलाल घरडे यांनी वसंत हुमणे यांना खासगी कामासाठी मार्च २०१५ मध्ये हातउसणे १२ लाख ५० हजार रुपये दिले हाेते. त्याबाबत करारनामाही करवून घेतला हाेता. करारनाम्यानुसार २९ जून २०१५ नंतर वेळाेवेळी रक्कम परत देण्याची विनंती केली. परंतु वसंत हुमणे ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत हाेते. शेवटी ३० जानेवारी २०१६ राेजी त्यांनी कॅनेरा बॅंकेच्या वरठी शाखेचा धनादेश फिर्यादीला दिला. परंतु सदर धनादेश बॅंक खात्यात वटविला असता ताे बाउंस झाला. कायदेशीर नाेटीसही २८ मार्च २०१६ ला आराेपीला देऊनही बाउंस झालेल्या चेकवरील रक्कम फिर्यादी चंदनलाल घरडे यांना आराेपीने दिली नाही. त्यामुळे कलम १३८ नुसार तक्रार दाखल करून न्यायालयाने अखेर या आर्थिक व्यवहाराच्या जवळ जवळ सहावर्षांनंतर न्यायालयाने आराेपी वसंत हुमणे यांना आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या कलम १३८च्या गुन्ह्यासाठी दाेषी ठरवून २० लाख रुपये दंड स्वरुपात फिर्यादीला देण्याचे आदेश दिले. तसेच चार महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षाही आराेपी वसंत हुमणे यांना १६ मार्च २०२२ राेजी न्यायालयाच्या न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुनावण्यात आली आहे.आपसात त्यांचे घरगुती संबंध असल्यामुळे हा आर्थिक व्यवहार घडला. मात्र या आर्थिक फसवणुकीतून चंदनलाल घरडे यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. फिर्यादी चंदनलाल घरडे यांच्या वतीने ॲड. हरडे यांनी काम बघितले व फिर्यादीला न्याय मिळवून दिला. या निर्णयामुळे आता फसवणुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालय