शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६ प्रकल्प तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे६३ प्रकल्प : गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्के जलसाठा अधिक

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या ६३ मध्यम, लघू, जुने मालगुजारी प्रकल्पात सोमवार रोजी ६३.९६ टक्के जलसाठा आहे. यातील सहा लघु प्रकल्प व दहा जुने मालगुजारी तलाव असे एकूण १६ प्रकल्प तुडूंब भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पामध्ये १४ टक्के जलसाठा अधिकचा आहे.
भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात अचानक भरीव वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अत्यल्प जलसाठा होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांची चिंता निर्माण झाली होती. शेतकरी धास्तावला असतानाच गत आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आता सुखावला आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागांतर्गत चार मध्यम प्रकलप आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा. मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे. १७ ऑगस्ट रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ६२.९१, बघेडा ८३.९६, बेटेकर बोथली ५४.८८ तर सोरना जलाशयात ३२.६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ६८.९८ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा साठा ७८.९५ टक्के आहे.
जिल्ह्यातील १६ सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असून जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प व माजी मालगुजारी तलावात जलसाठ्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्यकता असतानाच ऑगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात झालेल्या पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदीत आहे.

तुडूंब भरलेले प्रकल्प्
जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांतर्गत दहा जुने मालगुजारी तलाव व सहा लघु प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामध्ये कवलेवाडा, डोंगरला, कारली, नागठाणा, मंडनगाव, गुढरी, रेंगेपार कोठा. लघु प्रकल्प व एकोडी, आमगाव, पिंडकेपार, पाथरी, परसोडी, लवारी, सानगडी, रेंगेपार कोहळी, कनेरी व चालना येथील मालगुजारी तलावांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ टक्के जलसाठा अधिक आहे. २०१८ मध्ये जलसाठा केवळ ३९.३७ टक्के एवढा होता. गत दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक आहे.