शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१४,५७४ कुटुंबे शौचालयापासून वंचित

By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST

देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत निर्मल भारत करण्यासाठी गावागावात वैयक्तीक शौचालये बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र साकोली

उदासिनता कारणीभूत : निर्मलग्राम योजनेचा बोजवारासंजय साठवणे - साकोलीदेशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत निर्मल भारत करण्यासाठी गावागावात वैयक्तीक शौचालये बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र साकोली तालुक्यातील १४ हजार ५७४ कुटुंबाजवळ शौचालय नाहीत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनचे उद्दीष्ट आणि निर्मलग्राम योजना साकोली तालुक्यात यशस्वी होण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या साकोली तालुक्यात ९६ गावे असून ६४ ग्रामपंचायती आहेत. या तालुक्याची लोकसंख्या दोन लाखाच्यावर आहे. मात्र योजनांची अपूर्ण माहिती व अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्याचा कामचुकारपणा यामुळे साकोली तालुक्यातील १४ हजार ५७४ कुटूंबे आजही शौचालयापासून वंचित आहेत. त्यामुळे या कुटुंबातील लोकांना गावाशेजारी उघड्या जागेवर शौचास बसावे लागते. त्यामुळे गावात रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लागले आहे. ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी उघड्यावर शौचास बसण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी विविध नियम व कायदे लागू करण्यात आले आहेत. २००३ ते २०१३ पर्यंत स्वच्छता अभियानातून हागणदारी मुक्त गावांची संकल्पना शासनाने मांडली होती. २०१३-१४ मध्ये ही योजना निर्मल भारत अभियान राबविण्यात आली. ग्रामीण भागातील अस्वच्छता दूर करण्यासाठी शौचालयाची योजना राबविण्यात येत असली तरी जनतेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शौचालयासाठी राज्य शासनाकडून १० हजार रूपये अनुदान दिले जात होते. यात निर्मल भारत योजनेतून ४,३०० रूपये आणि नरेगातून ५,४०० रूपये दिले जात होते. मात्र वाढती महागाई लक्षात घेता नरेगाला वगळून अनुदानात दोन हजार रूपयाची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे हे अनुदान आता १२ हजार रूपयांवर पोहोचले आहे. ही संपूर्ण रक्कम एकाचवेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या अनुदानातून शौचालयासह पाण्याची सोय करण्यांची जबाबदारी लाभार्थ्यांची आहे.