शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पन्नासपेक्षा जास्त वयाचे १३७ होमगार्ड बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

भंडारा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड हेही कोरोना काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, शासनाच्या ...

भंडारा : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड हेही कोरोना काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मात्र, शासनाच्या नियमानुसार ५० पेक्षा जास्त वय असलेल्या होमगार्डला ड्युटी मिळणार नसल्याने जिल्ह्यातील १३७ होमगार्ड बांधवांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

जिल्ह्यात निवडणुका असो की कोणताही धार्मिक उत्सव, रॅली, सभा, राजकीय नेतेमंडळींचे दौरे कोणत्याही कार्यक्रमाचा बंदोबस्त असल्यास पोलिसांच्या मदतीसाठी तसेच बंदोबस्तासाठी होमगार्डची सेवा घेतली जाते. जिल्ह्यात महिला होमगार्डही कार्यरत आहेत. मात्र जेवढे दिवस उपस्थित रहावे लागते तेवढेच मानधन त्यांना वितरित केले जाते. मिळणारे मानधनही तुटपुंजे असल्याने शासनाने होमगार्ड बांधवांचे मानधन वाढविण्याची मागणी होत आहे.

असे असले तरीही पोलीस प्रशासनातर्फे होमगार्ड बांधवांचे मानधन वेळेत निघण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्नरत असतात. त्यातही कोरोना काळात होमगार्ड बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांकडून स्वतः देखरेखीत कामकाज पाहिले जाते. तसेच होमगार्ड बांधवांना येणाऱ्या विविध अडचणी त्यांच्या मदतीने सोडविल्या जात आहेत. मात्र, शासन स्तरावर मानधन वाढीची मागणी होमगार्ड बांधवांमधून होत आहे.

बॉक्स

७१९ होमगार्ड बांधवांना कोरोना लसीकरण

जिल्ह्यातील ८०५ नोंदणीकृत होमगार्डपैकी ७१९ होमगार्डना कोरोनाची लस मिळाली आहे. सध्या ५०० होमगार्ड सेवेत आहेत. तर ५० पेक्षा जास्त वय असलेले १३७ होमगार्ड आहेत. त्यात जिल्ह्यात महिला होमगार्डची संख्या ९४ आहे. जिल्ह्यात विविध उत्सवांच्या काळात या होमगार्डनी आपले कर्तव्य निभावले आहे. त्यामुळे यांचे मानधन वेळेत निघावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांचे विशेष लक्ष असते.

कोट

पोलिसांच्या बरोबरीने आम्ही कर्तव्य निभावत आहोत. शासनाने पोलीस भरतीमध्ये होमगार्डना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. यासोबतच आम्हांला दर महिन्याला फिक्स वेतन सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.

एक होमगार्ड

कोट

अनेकदा बंदोबस्तासाठी घरापासून काही दिवस बाहेर रहावे लागते. अशावेळी खाण्यापिण्यासह पेट्रोलवर होणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाने होमगार्ड बांधवांचे मानधन वाढवून निवृत्ती वेतन सुरू करण्याची गरज आहे.

एक होमगार्ड.

कोट

होमगार्डला अल्प मानधन मिळते. त्यातच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासूनची असणारी मानधन वाढीची मागणी शासनाने पूर्ण केली नसल्याने होमगार्ड ऑफिसमध्ये शासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

एक होमगार्ड.