प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:49+5:30

विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत.

- | प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

प्रशासनाने हटविले जिल्हाभरातील २२५२ फलक

Next
ठळक मुद्देचौकांनी घेतला मोकळा श्वास : आदर्श आचार संहितेअंतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्ह्यातील चौकाचौकात लावलेले २२५२ फलक हटविले आहेत. यात होर्डींग, बॅनर, पोस्टर आणि पॉम्प्लेटचा समावेश आहे. यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा होताच आदर्श आचारसंहिता सुरु झाली. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिले.
या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद, नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खासगी व शासकीय कार्यालय परिसरात असलेले होर्डींग, बॅनर, पोस्टर्स ४८ तासाच्या आत हटविण्याची कारवाई निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. साकोली, तुमसर आणि भंडारा विधानसभा क्षेत्रातील तब्बल २२५२ फलक हटविण्यात आले आहेत.
तुमसर क्षेत्रात सर्वाधिक १५४९, साकोली ५२४ आणि भंडारा क्षेत्रात १७९ फलकांचा समावेश आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे बॅनर, पोस्टर्स, फलक लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.
शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास आणि खासगी ठिकाणी लावण्यात आलेले फलक ७२ तासात हटविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या आदेशान्वये जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. हटविण्यात आलेल्या जागेवरील फलक पुन्हा लागणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
शहरी भागासह ग्रामीण भागात नेत्यांच्या वाढदिवसापासून ते विविध कार्यक्रमांचे फलक लावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतरही महिनोंमहिने फलक दिसून येत होते. आता आदर्श आचारसंहितेने सर्व फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

सोशल मीडियावर सायबर सेलची नजर
विधानसभा निवडणूक काळात सोशल मिडीयाचा वापर करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर राहणार आहे. आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम व इतर सोशल साईटवर निवडणूक काळात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणे बेकायदेशीर आहेत. नागरिकांनी संदेश काळजीपूर्वक वाचूनच फॉरवर्ड करावेत. कुठल्याही व्यक्तीची, समाजाची, धर्माची, महिलांची, राजकीय व्यक्तींची प्रतिमा मलीन होईल असे मॅसेज फॉरवर्ड करू नये. विशेष म्हणजे सोशल मिडीयावरील मॅसेजला सायबर सेल मॉनीटरींग करणार आहे. अनावधानाने सुद्धा पोस्ट लाईक किंवा शेअर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.